Paris Olympic 2024 : हॉकीत अमित रोहिदासशिवाय खेळणार भारतीय संघ

उपान्त्य फेरीत अमित रोहिदासला रेड कार्डमुळे खेळता येणार नाही.

86
Paris Olympic 2024 : हॉकीत अमित रोहिदासशिवाय खेळणार भारतीय संघ
Paris Olympic 2024 : हॉकीत अमित रोहिदासशिवाय खेळणार भारतीय संघ
  • ऋजुता लुकतुके

भारताचा आधाडीचा बचावपटू अमित रोहिदासला (Amit Rohidas) उपउपान्त्य लढतीत ग्रेट ब्रिटनविरुद्ध मिळालेल्या रेडकार्डमुळे त्याचा उपान्त्य फेरी सामन्यात खेळता येणार नाही. भारताचा उपान्त्य फेरीतील मुकाबला मंगळवारी रात्री साडेदहा वाजता जर्मनीशी होणार आहे. आणि रोहिदास हा भारताचा पहिल्या फळीतील बचावपटू आहे.

ग्रेट ब्रिटन विरुद्धही भारताला अमितच्या अनुपस्थितीचा फटका बसला. कारण, सामना सुरू होताच पंधराव्या मिनिटालाच अमित रोहिदासची (Amit Rohidas) हॉकी स्टिक प्रतिस्पर्धी खेळाडूला लागली. आणि त्याला रेड कार्ड दाखवण्यात आलं. त्यानंतर जवळ जवळ ४५ मिनिटं भारतीय संघ मैदानात फक्त १० खेळाडूंसह खेळला. त्यामुळे ग्रेट ब्रिटनला भारतीय भागात हल्ले चढवणं सोपं गेलं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी)

अमितने प्रतिस्पर्धी खेळाडूकडून चेंडू हिसकावून घेण्याच्या नादात स्टिक खांद्याच्यावर नेली. आणि नेमकी ती प्रतिस्पर्धी खेळाडूला लागली. तो खेळाडू मैदानावर कोसळला. अजाणतेपणाने झाला असला तरी तो गंभीर अपराध आहे. आणि पंचांनी तातडीने अमित रोहिदास (Amit Rohidas) आणि भारतीय कर्णधार हरमनप्रीतला बोलावून तंबी दिली. आणि अमितला रेडकार्ड दाखवलं. भारतासाठी हा मोठा धक्का होता. कारण, उर्वरित ४५ मिनिटं भारताला १० खेळाडूंसह खेळावं लागलं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – BMC : उपनगरांतील रस्ते कामांच्या कंत्राटांना मंजुरी, शहर भागातील कंत्राट वाटाघाटीतच अडकले)

कारण, फुटबॉलमध्ये रेडकार्ड मिळालं, तर खेळाडूला पुढचा सामनाही खेळता येत नाही. पण, हॉकीत रेडकार्ड मिळाल्यावर तेव्हाचं फुटेज पाहून रेफरी फेरआढावा घेतात. आणि सामन्यानंतर निकाल जाहीर करतात. आधी सामन्याच्या वेळी मैदानात असलेले पंच आपला अहवाल तांत्रिक समितीला सादर करतात. ही समिती सामन्याचं फुटेज पाहून अमित रोहिदासविषयी निर्णय घेते. पण, फुटेज पाहिल्यावर अमितने हा फटका हेतुपुरस्सर न मारल्याचा कुठलाही पुरावा या समितीला आढळला नाही. आणि त्यामुळे अमितला उपान्त्य सामना खेळता येणार नाही. (Paris Olympic 2024)

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या खांद्याच्या वर हॉकी स्टिक बसली तर तो गंभीर अपराध असतो. फक्त इथं अमितने ते हेतूपुरस्सर केलेलं नाही, असं त्याला सिद्ध करावं लागेल. भारतीय संघाला बसलेला हा खूप मोठा धक्का आहे. कारण, अमित रोहिदास (Amit Rohidas) हा भारताचा अव्वल बचावपटू आहे. आणि जर्मन संघाने ज्या प्रकारे आतापर्यंत स्पर्धेत आक्रमण केलं आहे, ते पाहता, हा मुकाबला जर्मनीची आघाडीची फळी विरुद्ध भारताचा बचाव अशीच होणार आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.