- ऋजुता लुकतुके
शुक्रवारच्या रंगारंग उद्घाटन सोहळ्यानंतर शनिवारी भारतीय नेमबाज (Shooting), बॅडमिंटनपटू (Badminton), हॉकी संघ (Hockey team) तसंच मुष्टीयोद्धे आणि कुस्तीपटू आपापले प्राथमिक फेरीचे सामने खेळणार आहेत. त्याचबरोबर टेनिस आणि टेबलटेनिसच्या प्राथमिक फेऱ्याही सुरू होणार आहेत. शनिवारचं भारतीय खेळाडूंसाठीचं वेळापत्रक पाहूया, भारतीय प्रमाण वेळेत. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Mumbai Local Megablock: घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा!)
- रोईंग
१२.३० वाजता दुपारी बजरंग पनवर एकेरी स्कल्स प्रकारात खेळेल
- नेमबाजी
१२.३० – १० मीटर मिश्र सांघिक पात्रता फेरीत संदीप सिंग व इलावेनिल रवाविरेन तसंच अर्जुन बबुता व रमिता जिंदाल या भारतीय जोड्या खेळतील.
२.०० – अर्जुन सिंग चिमा आणि सरबज्योत सिंग हे १० मीटर एअर पिस्तुल पुरुषांच्या गटात पात्रता फेरी खेळतील
४.०० मनू भाकर आणि रिधम सांगवान महिला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पात्रता फेरी खेळतील
- टेनिस
३.३० – रोहन बोपान्ना व एन श्रीराम बालाजी यांचा मुकाबला एडोअर्ड रॉजर-व्हेसेलिन व फाबियान रिबोल यांच्याशी होईल
- बॅडमिंटन
७.०० – लक्ष्य सेन वि. केविन कॉर्डन हा प्राथमिक फेरीचा सामना
८.०० – सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी वि. ल्युकास कोरवी व रोनान लेबर प्राथमिक फेरीचा सामना
११.५० – अश्विनी पोनप्पा व तनिषा क्रेस्टो वि. किम यो याँग व काँग ही याँग, प्राथमिक फेरीचा सामना
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचा रंगारंग उद्घाटन सोहळा, फ्रान्सची फॅशन आणि क्रीडा यांचा मिलाफ)
- टेबल टेनिस
७.१५ – हरमित देसाई वि. झैद आबो यमान यांचा प्राथमिक फेरीचा सामना
- हॉकी
९.०० – भारत वि न्यूझीलंड ब गटातील साखळी सामना
(हेही वाचा- Local Train Stunt: धावत्या लोकलमधून धोकादायक स्टंट करणं बेतलं जीवावर; ‘त्या’ व्हायरल तरुणासोबत घडलं असं काही…)
- मुष्टियुद्ध
१२.३० मध्यरात्री – प्रीती पवारची ५४ किलो वजनी गटात पहिली फेरी
हेही पहा-
Join Our WhatsApp Community