Paris Olympic 2024 : तिरंदाजीत भारतीय महिला अपयशी, उपउपान्त्य फेरीत गुंडाळला गाशा

तिरंदाजीत भारतीय महिलांचा नेदरलँड्सने सलग ६ सेटमध्ये पराभव केला.

208
Paris Olympic 2024 : तिरंदाजीत भारतीय महिला अपयशी, उपउपान्त्य फेरीत गुंडाळला गाशा
Paris Olympic 2024 : तिरंदाजीत भारतीय महिला अपयशी, उपउपान्त्य फेरीत गुंडाळला गाशा
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सांघिक तिरंदाजीत सहावी क्रमवारी मिळवून थेट उपउपान्त्य लढतीत प्रवेश करणाऱ्या महिला संघाने मुख्य स्पर्धेत मात्र थेट निराशा केली. नेदरलँड्स विरुद्ध दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत  यांची डाळ शिजली नाही. दडपणाखाली तिरंदाजी करताना अंकिताने तर एकदा १० पैकी फक्त ४ गुण मिळवले. याउलट नेदरलँड्सच्या चमूने प्रत्येक सेटमध्ये किमान एकदा १० हा सर्वोत्तम आकडा गाठला. (Paris Olympic 2024)

एकट्या भजन कौरने ६० पैकी ५६ गुण मिळवले. पण, दीपिका आणि अंकिता यांची साथ न मिळाल्यामुळे भजनची लढत अपुरी ठरली. भारताचा ०-६ (५१-५२, ४८-५३ आणि ४८-५४) असा पराभव झाला. दीपिका कुमारीचं हे चौथं ऑलिम्पिक होतं. आणि एका मुलीला जन्म दिल्यानंतर जिद्दीने ती ऑलिम्पिकसाठी तयारी करत होती. पण, ६० पैकी ती फक्त ४८ गुण मिळवू शकली. तर क्रमवारीच्या फेरीत चांगली कामगिरी करणारी अंकिता भकत फक्त ४६ गुण मिळवू शकली. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Mumbai Sion Bridge: शीव रेल्वे उड्डाणपूलाबाबत मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! जरुर वाचा…)

क्रमवारीच्या फेरीत चौथे येऊनही संघाच्या पदरी एवढं मोठं अपयश पडलं आहे. दीपिका कुमारीने फक्त एकदा शेवटचा नेम साधताना १० गुण मिळवले. खासकरुन दीपिकाच्या कामगिरीवर सगळीकडून निराशा व्यक्त होत आहे. भारतीय तिरंदाजांच्या संघाबरोबर असलेल्या एका तिरंदाजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यानेही पीटीआयशी बोलताना संघाच्या अपयशाबद्दल दु:ख व्यक्त केलं. आणि दीपिकाच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली. तर संघाच्या प्रशिक्षक पोर्णिमा महातो यांनीही दडपणाचा सामना करताना खेळाडू कमी पडल्याचं कबूल केलं. ‘दीपिकाकडे एवढा अनुभव असताना ती कमी पडली. आणि इतरांनीही बराच वेळ धनुष्य ताणलेल्या अवस्थेत धरुन ठेवला. वेळेवर तो सोडण्याची नेहमीची प्रक्रियाही पार पाडली नाही. अशावेळी दडपण वाढत जातं. आणि महिला तिरंदाजांचं तेच झालं,’ असं महातो पीटीआयशी बोलताना म्हणाल्या. (Paris Olympic 2024)

भारतीय पुरुषांचा संघही उपउपान्त्य फेरीत पोहोचला आहे. आणि सोमवारी त्यांनी पहिला सामना जिंकला तर ते बाद फेरीत पोहोचतील. सोमवारी भारतासाठी नेमबाजीच्या दोन तर पुढेचाल मिळाल्यास तिरंदाजीचा एक पदक विजेता सामना होणार आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.