- ऋजुता लुकतुके
यावेळी टेनिसमध्ये भारताची तयारी फारशी चांगली नव्हतीच. सुमित नागल आणि रोहन बोपान्नाने (Rohan Bopanna) आपल्या क्रमवारीच्या जोरावर ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. आणि मग बोपान्नाचा साथीदार म्हणून त्याने बालाजीची निवड केली. ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी बोपान्नाने पदकाचं सुतोवाचही केलं होतं. सगळ्यात मोठ्या वयात टेनिस ऑलिम्पिक पदक जिंकण्याची इच्छा आहे, असं तो म्हणाला होता. पण, प्रत्यक्षात दोन्ही संघांचं आव्हान पहिल्याच दिवशी संपुष्टात आलं आहे. (Paris Olympic 2024)
सुमित नागर एकेरीतील लढतीसाठी आधी कोर्टवर उतरला. कॉरेंटिन मॉटेट विरुद्ध ३ सेटच्या चिवट झुंजीनंतर त्याचा पराभव झाला. पहिला सेट सुमितने ६-२ असा जिंकला होता. त्यामुळे त्याच्याकडून आशा होत्या. दुसरा सेट ४-६ असा गमावल्यानंतर निर्णायक सेटमध्येही सुरुवातीलाच सुमितने २-० अशी आघाडी घेतली होती. पण, त्याला ती टिकवता आली नाही. पुढे दोनदा त्याचीच सर्व्हिस भेदली गेली. आणि अखेर हा सेट ५-७ ने गमावत त्याने सामनाही गमावला.
(हेही वाचा – Live In Relationship मध्ये रहाणार्यांना संरक्षण देणे चुकीचे; पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निरीक्षण)
Not the result we were hoping for but a brave brave effort from Sumit Nagal against Corentin Moutet of France who was backed by a partisan crowd. Nagal lost 2-6 6-2 5-7 but can be proud of his effort. Best wishes for future events #Paris2024 #IndianTennis pic.twitter.com/SvoKOgVyuW
— Rahul Bhutani (@BhutaniRahul) July 28, 2024
या सामन्यानंतर काही तासांनी त्याच कोर्टवर रोहन बोपान्ना आणि एन श्रीराम बालाजी यांचा मुकाबला होता तो गेल मॉनफिल्स आणि एडवर्ड रॉजर व्हेसलिन या फ्रेंच जोडीशी. पण, इथंही भारतीय जोडीची डाळ शिजली नाही. ५-७ आणि २-६ असा सरळ सेटमध्ये बोपान्ना – बालाजी जोडीचा पराभव झाला. (Paris Olympic 2024)
मॉनफिल्सने ताकदवान फटके खेळत भारतीय जोडीला बेजार केलं. त्या मानाने बोपान्ना – बालाजी जोडीचा क्ले कोर्टवरील वेग कमी होता. पहिला सेट त्यांनी थोडी तरी लढत दिली. पण, दुसऱ्या सेटमध्ये दोघांची सर्व्हिस एकेकदा भेदली गेली. ४४ वर्षीय रोहन बोपान्नाचं (Rohan Bopanna) हे शेवटचं ऑलिम्पिक असेल. तसंच भारताचं प्रतिनिधित्व करणयाचीही कदाचित ही त्याची शेवटची वेळ ठरावी. डेव्हिस कपमधून त्याने यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community