Paris Olympic 2024 : तिरंदाजीत भारताच्या महिला, पुरुष व मिश्र संघांची उपांत्य फेरीत धडक 

Paris Olympic 2024 : पुरुषांमध्ये धीरज बोमदेवरा तर महिलांमध्ये अंकिता भाकट अव्वल

118
Paris Olympic 2024 : तिरंदाजीत भारताच्या महिला, पुरुष व मिश्र संघांची उपांत्य फेरीत धडक 
Paris Olympic 2024 : तिरंदाजीत भारताच्या महिला, पुरुष व मिश्र संघांची उपांत्य फेरीत धडक 
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिकचं अधिकृत उद्धाटन झालं नसलं तरी फुटबॉल आणि तिरंदाजीच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. यात भारतीय पुरुष व महिला संघांनी तिरंदाजांनी सांघिक स्पर्धेची उपांत्य फेरी थेट गाठली आहे. पुरुषांमध्ये धीरज बोमदेवरा (Dhiraj Bommadevara) हा सगळ्यात यशस्वी तिरंदाज ठरला. वैयक्तिक कामगिरीत तो चौथा आला आहे. धीरजने अलीकडेच विश्वचषक स्पर्धेतही कांस्य मिळवलं होतं. (Paris Olympic 2024)

फक्त महिला आणि पुरुषच नाही तर मिश्र सांघिक स्पर्धेतही भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुरुषांमध्ये धीरज तर महिलांमध्ये अंकिता भाकट (Ankita Bhakat) अव्वल ठरली. भारताच्या पुरुषांच्या संघाला २०१३ गुण मिळाले. तर मिश्र संघाला १,३४७ गुण मिळाले. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Maharashtra Rain : राज्यात पावसाची विश्रांती; आज २६ जुलै रोजी ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट)

भारतीय पुरुष संघात धीरजने ६८१ गुणांसह चौथा क्रमांक मिळवला. तर तरुणदीप रायने ६७४ गुणांसह १४ वा क्रमांक पटकावला. प्रवीण जाधव (Praveen Jadhav) ६५८ गुणांसह ३९ वा आला. थेट उपांत्य फेरीत धडक दिल्यामुळे पुरुषांच्या संघाने दुसऱ्या फेरीत बलाढ्य कोरियाबरोबरची टक्करही टाळली आहे. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ टर्की किंवा कोलंबियाशी पडेल. संघाने आगेकूच केल्यास थेट अंतिम फेरीत कोरियाशी लढत होईल. (Paris Olympic 2024)

दुसरीकडे, महिलांमध्ये ऑलिम्पिक पदार्पण करणारी अंकिता भाकट (Ankita Bhakat) ही भारताची सर्वोत्तम तिरंदाज ठरली. तिने अकरावा क्रमांक पटकावला. तर दीपिका कुमारी (Deepika Kumari) २३ वी आणि भजन कौर (Bhajan Kaur) २२ वी आली. महिलांनी एकूण १९८३ गुणांची कमाई करत सांघिक क्रमवारीत चौथा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे महिलांनीही थेट उपांत्य फेरी गाठली आहे. महिला संघाची उपांत्य फेरीत फ्रान्स किंवा नेदरलँड्स यांच्याशी गाठ पडणार आहे. (Paris Olympic 2024)

उपांत्य फेरीचा अडथळा पार केल्यावर मात्र महिला संघाची गाठ दक्षिण कोरियाशी पडेल. दक्षिण कोरियाच्या संघाने तिरंदाजीत २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून तब्बल ९ पदकंम मिळवली आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एकही सुवर्ण सोडलेलं नाही. अंकिता आणि धीरजच्या फॉर्ममुळे मिश्र संघानेही सहज उपउपान्त्य फेरी गाठली आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.