Paris Olympic 2024 : इमान खलिफच्या दोन पंचेसमुळे ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंची ‘जेंडर फाईट’ का सुरू झाली?

Paris Olympic 2024 : अल्जेरियाची इमान खलिफ खरंच पुरुष खेळाडू आहे?

165
Paris Olympic 2024 : इमान खलिफच्या दोन पंचेसमुळे ऑलिम्पिकमध्ये खेळाडूच्या ‘जेंडर फाईट’ का सुरू झाली?
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत या आठवड्यात एका विचित्र वादाला तोंड फुटलं. महिलांच्या वेल्टरवेट गटात रंगलेल्या सामन्यात इटलीच्या अँजेला कारिनी आणि अल्जेरियाची इमान खलिफ यांच्यात सामना होता. जेमतेम ४६ सेकंदं झाली असतील कारिनीने सामना अर्धवट सोडला. त्यामुळे इमानला विजेती घोषित करण्यात आलं. पण, सामन्यानंतर कारिनी अखंड रडत होती आणि तिने इमानशी हस्तांदोलनही करायला नकार दिला. (Paris Olympic 2024)

तिचं म्हणणं होतं, ‘माझा मुकाबला एका पुरुषाशी झाला. त्याचे दोन ठोसे इतके जोरदार होते की, माझं नाक अजून दुखतंय. तो ठोसा मी सहनच नाही करू शकले. हे अयोग्य आहे. मला लढायचं होतं. पण, लढत अर्धवट सोडावी लागली.’ ती असं म्हणाली मात्र आणि इमान खलिफवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला. खरंच इमान खलिफ पुरुष आहे का आणि एका पुरुषाचा मुकाबला मुलीशी लावण्यात आला होता का, असा हा वाद आहे.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिसमधील उष्णतेचा सामना करण्यासाठी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये आयओए बसवणार ४० वातानुकूलन यंत्र)

कारण २०२३ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामन्यापूर्वी इमान खलिफची लिंग चाचणी घेण्यात आली होती. ती दोषी आढळल्याने तिला या स्पर्धेत खेळू दिलं नव्हतं. असं असूनही ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या स्पर्धेत सहभागी केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. इमान खलिफच्या वैद्यकीय चाचणीत टेस्टोस्टेरोनचं प्रमाण अधिक असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचबरोबर तिच्या डीएनए चाचणीत XY क्रोमोजोम्स मिळाले होते. XY क्रोमोजोम्स म्हणजेच मुलगा असल्याचं सिद्ध होतं. मुलींमध्ये क्रोमोजोम्स XX असतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने खलिफवर बंदी घातली होती.

म्हणजेच चाचणीत इमान खलिफ मुलगी नसल्याचं सिद्ध झालं होतं. इतक्या मोठ्या आरोपानंतरही खलिफला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत संधी कशी मिळाली? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. ऑलिम्पिकमध्ये मुष्टीयुद्ध खेळाचं नियामन व्यावसायिक मुष्टीयुद्ध संघटना करत नाही. ती जबाबदारी ऑलिम्पिक परिषदेकडे आहे. ऑलिम्पिक समितीने १९९९ मध्ये लिंग चाचण्या बंद केल्या आहेत. त्याचा फायदा उचलत खलिफ ऑलिम्पिकमध्ये महिला म्हणून आली असा हा आरोप होता. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Olympic Games Paris 2024 : ‘पुरुष’ असूनही महिलांविरुद्ध बॉक्‍सिंग खेळणार्‍या इमेन खेलीफचा जगभरातून होतोय विरोध)

पण, यात नेमकं सत्य काय आहे?
  • मुष्टीयोद्धा इमान खलिफ २५ वर्षांची आहे. अल्जेरियातील तियारेत येथील निवासी आहे.
  • ती युनिसेफ ब्रँड अॅंम्बेसेडर आहे. इमान खलिफ आतापर्यंत एकूण ५० सामने खेळली असून त्यात फक्त नऊ वेळा हरली आहे.
  • इमान खलिफचे वडील सुरूवातीला तिच्या मुष्टियुद्ध खेळण्याविरोधात होते. कारण त्यांना वाटत होतं की महिलांनी हा खेळ खेळू नये.
  • २०१८ मध्ये खलिफनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने कारकीर्दीची सुरूवात केली होती. मात्र त्या स्पर्धेत ती १७ व्या स्थानावर राहिली.
  • २०१९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ती १९ व्या स्थानावर फेकली गेली. २०२१ च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडच्या केली हॅरिंग्टननं तिचा पराभव केला होता.
  • त्यानंतर झालेल्या महिलांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियशिपमध्ये मुसंडी मारत खलिफनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. या स्पर्धेत खलिफला अॅमी ब्रॉडथ्रस्टकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र तिची कामगिरी नक्कीच उंचावली होती.
  • २०२२ ची आफ्रिकन चॅम्पियनशिप, मेडिटेरेनियन गेम्स आणि २०२३ च्या अरब गेम्समध्ये तिनं सुवर्णपदक पटकावलं होतं.
  • नवी दिल्लीत झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमर क्रेमलेव यांनी म्हटलं होतं, “डीएनए चाचणीतून आम्हाला आढळलं की चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणाऱ्या अनेक बॉक्सर्सने चलाखी करत स्वत:ला महिला दाखवण्याचा प्रयत्न केला होता.”
  • “मात्र चाचणीनंतर आढळलं की त्यांच्या शरीरात एक्स-वाय गूणसूत्रे होती. अशा खेळाडूंना स्पर्धेतून बाहेर काढलं जातं,” असं ते पुढे म्हणाले.
  • २०२३ मध्ये भारतात महिलांची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली होती. त्यावेळेस खलिफच्या लैंगिक ओळखीबद्दलचा मुद्दा समोर आला होता.
  • अशाच एका प्रकरणात मागील वर्षाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तैवानच्या लिन यु-थिंग कडून तिचं कांस्य पदक परत घेण्यात आलं होतं.
  • ती लिंगविषयक पात्रता चाचणीत अपयशी ठरली होती. मात्र यंदा ती पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी झाली आहे. शुक्रवारी ती एका सामन्यात खेळली होती.
  • आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं म्हटलं की या स्पर्धेतील मुष्टीयुद्ध सामन्यात भाग घेणारे सर्व मुष्टीयोद्धे आवश्यक निकषांची पूर्तता करत आहेत.
  • समितीचे प्रवक्ते मार्क अॅडम्स म्हणाले, “हे खेळाडू अनेकवेळा असंख्य स्पर्धांमध्ये खेळले आहेत. ते इथे अचानक आलेले नाहीत. ते टोकियो ऑलिंपिकमध्ये देखील खेळले होते.”
  • २०२३ मध्ये खलिफ आणि लिन यांना ज्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्याचं आयोजन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं केलं होतं.
  • मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं मागील जूनमध्ये रशियाच्या नेतृत्वाखालील या संघटनेचं जागतिक संचालक मंडळ म्हणून असलेलं सदस्यत्व रद्द केलं होतं.
  • टोकियो आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंग सामन्यांचं आयोजन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडूनच केलं जातं आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.