-
ऋजुता लुकतुके
भारतीय बॅडमिंटनपटूंनी या ऑलिम्पिकमध्ये आपली आगेकूच सुरूच ठेवली आहे. महिला गटात पी व्ही सिंधूने (PV Sindhu) तर पुरुषांच्या दुहेरीत सात्त्विकसाईराज (Satwiksairaj) आणि चिराग (Chirag) यांनी आरामात बाद फेरी गाठली आहे. तर पुरुषांच्या एकेरीत पहिल्या बाद फेरीत एच एस प्रणॉय (HS Prannoy) आणि लक्ष्य सेन (Lakshya Sen) यांची एकमेकांशी गाठ पडणार आहे. लक्ष्यने ऑल इंग्लंड विजेता आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोनाथन ख्रिस्तीचा २१-१८ आणि २१-१२ असा पराभव केला. लक्ष्य या सामन्यात चांगल्याच फॉर्ममध्ये होता. शटल अगदी जाळ्याच्या जवळ ठेवत आणि वारंवार ख्रिस्तीच्या उजव्या बाजूला मारत लक्ष्यने सुरुवातीलाच सामन्यावर वर्चस्व गाजवलं. (Paris Olympic 2024)
ख्रिस्तीचे बरोबरीचे सगळे मनसुबे लक्ष्यने हाणून पाडले. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाश पदुकोण जातीने कोर्टवर हजर होते. त्यानेही खूप फरक पडला. पहिल्या गेममध्ये विजयाची आशा निर्माण झाल्यावर लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये मागे वळून पाहिलं नाही. क्रमवारीत अव्वल असलेल्या ख्रिस्तीला सहज हरवलं. आता बाद फेरीत त्याची गाठ भारताच्याच एच अस प्रणॉयशी पडणार आहे. (Paris Olympic 2024)
🇮🇳🏸 LAKSHYA SEN vs HS PRANNOY! Clash of India’s best in the round of 16.
💔 Only one advance to the quarter-final, but no matter the result, we are proud of you champs.
🕛 Time: 12 PM IST
📺📱 Catch the action live on the Sports 18 Network & the JioCinema app.
📷 Pics… pic.twitter.com/Pdu35ZgIGr
— The Bharat Army (@thebharatarmy) August 1, 2024
बुधवारी रात्री उशिरा एच एस प्रणॉयनेही (HS Prannoy) बाद फेरी गाठली. लक्ष्य बरोबरचा मुकाबला निश्चित केला. आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात प्रणॉयने डक फॅट लीला पहिला गेम गमावल्यानंतर हरवलं. त्याने लीवर १६-२१, २१-११ आणि २१-१२ ने मात केली. पहिल्या गेममध्येगी १५-१६ अशी स्थिती असताना प्रणॉयकडून काही चुका झाल्या. त्यामुळे पहिला गेम त्याने गमावला. पण, त्यानंतर मात्र त्याने स्वत:ला सावरत पुढील दोन गेममध्ये पुन्हा एकदा लढाऊ बाणा आणि आक्रमकता दाखवून दिली. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Delhi Rain : दिल्लीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, नवीन संसदेत पाणी साचलं)
दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीलाच प्रणॉयने १९-११ अशी आघाडी घेतली. १९ मिनिटांत हा गेम खिशात टाकला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीच्या काही गुणांसाठी चुरस असली तरी ११-८ वरून प्रणॉयने म्हणता म्हणता आघाडी १९-११ अशी नेली. तिसरा गेमही २१-१२ ने जिंकत सामना खिशात टाकला. आता लक्ष्य विरुद्ध प्रणॉय असा सामना गुरुवारी दुपारी बारा वाजता रंगणार आहे. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community