Paris Olympic 2024 : बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनची आगेकूच; सिंधू, सात्विकसाईराज – चिराग आणि प्रणॉयला पराभवाचा धक्का 

Paris Olympic 2024 : सिंधू आणि दुहेरीत सात्त्विकसाईराज, चिरागला अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला 

128
Paris Olympic 2024 : बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनची आगेकूच; सिंधू, सात्विकसाईराज - चिराग आणि प्रणॉयला पराभवाचा धक्का 
Paris Olympic 2024 : बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनची आगेकूच; सिंधू, सात्विकसाईराज - चिराग आणि प्रणॉयला पराभवाचा धक्का 
  • ऋजुता लुकतुके

बॅडमिंटनमध्ये भारतासाठी गुरुवारचा दिवस अनपेक्षित निकालांचा होता. पण, त्यातला फक्त एक निकाल भारताच्या बाजूने लागला. बाकी धक्केच बसले. सगळ्यात आधी संध्याकाळी साडेचार वाजता सात्विकसाईराज रांकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या दुहेरीतील पदकांची सगळ्यात मोठी आशा असलेली जोडी उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी कोर्टवर उतरली. त्यांचा मुकाबला मलेशियाची तिसऱ्या क्रमांकाची जोडी एरॉन शिया (Aaron Shea) आणि सोह वूई यिक (Soh Wooi-yik) यांच्याशी होता. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचा कांस्य पदक विजेता सरबज्योत सिंगचं मायदेशी जल्लोषात स्वागत)

पहिला गेम जिंकूनही भारतीय जोडीचा या सामन्यात पराभव झाला. २१-१३ असा पहिला गेम जिंकल्यावर दुसऱ्या गेममध्ये सात्विकसाईराजकडून काही चुका होत गेल्या. त्यांनी हा गेम १४-२१ असा गमावला. तिसऱ्या गेममध्ये १२-१० अशी आघाडी भारतीय जोडीकडे होती. १४-११ पर्यंत त्यांनी आघाडी टिकवून ठेवली. पण, त्यानंतर वेगवान खेळ करण्याच्या नादात चुकाही वाढत गेल्या. हा गेम त्यांना १६ – २१ असा गमावावा लागला. ऑलिम्पिक पदक या जोडीच्या हातून गेलं. (Paris Olympic 2024)

 २२ वर्षीय लक्ष्य सेनने मात्र भारताच्याच एच एस प्रणॉयचा (HS Prannoy) २१-१२ आणि २१-६ असा दोन गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या सामन्यात मूळातच लक्ष्य आक्रमक होता. त्याला चांगला सूर गवसला आहे. त्यातच बुधवारी उशिरा बाद फेरीचा शेवटचा सामना खेळलेल्या प्रण़ॉयला विश्रांतीच मिळू शकली नाही. त्यामुळे त्याची चांगलीच दमछाक झालेली दिसली. दुसऱ्या गेममध्ये तर त्याच्या हालचाली चांगल्याच मंदावल्या. याचा फायदा घेत लक्ष्यने दोनही गेम अगदी आरामात २० मिनिटांत जिंकले. लक्ष्य सेनच्या (Lakshya Sen) रुपाने बॅडमिंटनमध्ये भारताचं एकमेव आव्हान आता टिकून आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- त्यांना लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे; वेश बदलण्याच्या चर्चांवर Ajit Pawar भडकले)

त्याचा उपउपांत्य फेरीत मुकाबला चायनीज तैपेईच्या चाऊ तिन चेनशी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे लक्ष्यने आतापर्यंतचे सर्व सामने हे दोन सरळ गेममध्ये जिंकले आहेत. (Paris Olympic 2024)

 सात्त्त्विकसाईराज (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग (Chirag Shetty) प्रमाणेच पी व्ही सिंधूलाही (PV Sindhu) पराभवाचा कडू धोट पचवावा लागला. आपल्या तिसऱ्या ऑलिम्पिक पदकासाठी सिंधू उत्सुक होती. पण, पहिल्याच बाद फेरीत तिचा चीनच्या बिंग जिआओनं २१-१९ आणि २१-१४ असा ५६ मिनिटांत पराभव केला. सिंधूने निकराचा प्रयत्न केला. पण, तिच्याकडून काही बचावात्मक चुका झाल्या. त्याचा परिणाम तिच्या खेळावरही झाला. मोक्याच्या क्षणी तिच्या हातातून गुण निसटले. उलट अनुभवी बिंगने सामन्यावरील पकड निसटू दिली नाही. पराभवानंतर सिंधू चांगलीच निराश झाली होती. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.