Paris Olympic 2024 : जाणून घेऊया भारतीय पथकाचं बुधवारचं वेळापत्रक काय आहे

Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी (बुधवार, ३१ जुलै) सिंधू, दीपिका कुमार, लवलिना मैदानात

119
Paris Olympic 2024 : जाणून घेऊया भारतीय पथकाचं बुधवारचं वेळापत्रक काय आहे
Paris Olympic 2024 : जाणून घेऊया भारतीय पथकाचं बुधवारचं वेळापत्रक काय आहे
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतीय पथकाने २ कांस्य पदकं जिंकली आहेत. बुधवारी भारतासाठी एकही पदकाचा सामना नसला तरी त्यासाठीची पायाभरणी नक्कीच होणार आहे. तिरंदाज, मुष्टियुद्ध , बॅडमिंटन आणि नेमबाजी यात पुन्हा एकदा भारताची नारीशक्ती बुधवारी मैदानात उतरणार आहे. कारण, पी व्ही सिंधू (PV Sindhu), लवलिना बोरगोहेन (Lovlina Borgohain) आणि दीपिका कुमारी (Deepika Kumari) या अनुभवी खेळाडू आपापले सामने खेळणार आहेत. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin Yojana अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल..!)

बुधवारचं भारतीय पथकाचं ऑलिम्पिक वेळापत्रक समजून घेऊया,

  • नेमबाजी 

१२.३० – ऐश्वरी प्रताप सिंग तोमर, स्वप्निल कुसळे यांची ५० मीटर थ्री पोझिशन पात्रता फेरी

१२.३० – श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी यांचा महिला ट्रॅप प्रकारातील दुसरा दिवस

७.०० – संध्याकाळी श्रेयसी व राजेश्वरी यांचा ट्रॅप अंतिम सामना (पात्र ठरल्यास)

(हेही वाचा- Amol Mitkari यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू)

  • बॅडमिंटन 

१२.५० – पी व्ही सिंधू वि. क्रिस्टिन क्युबा (गटवार साखळीतील शेवटचा सामना)

१.४० – लक्ष्य सेन वि. जोनाथन क्रिस्ति (गटवार साखळीतील शेवटचा सामना)

११.०० – रात्री एच एस प्रणॉय वि. डक फॅट ली (गटवार साखळीतील शेवटचा सामना)

  • घोडेसवारी 

१.५८ – अनुष आगरवाला वैयक्तिक ड्रेसेज प्रकारातील दुसरा दिवस

(हेही वाचा- Wayanad landslides : मृतांची संख्या आतापर्यंत 123; केरळची स्थिती का झाली नाजूक ?)

  • टेबल टेनिस 

२.३० – दुपारी श्रीजा अकुजा वि. जियान झेंग (अंतिम ३२ जणांमधील लढत)

८.३० – रात्री मनिका बात्रा (अंतिम १६ जणांमधील लढत)

  • मुष्टियुद्ध 

३.५० – लवलिना बोरगोहेन सुनिवा होफस्टाड (७५ किलो वजनी गटाती अंतिम १६ मधील लढत)

००.३४ – मध्यरात्री निशांत देव वि. जोस ग्रॅब्रिएल रॉड्रिगेज टोनोरिओ (७१ किलो गटांत अंतिम १६ मधील लढत)

(हेही वाचा- Ind vs SL, 3rd T20 : तिसऱ्या टी-२० मध्ये सुपर ओव्हरमधील विजयासह भारताने मालिकाही ३-० ने जिंकली )

  • तिरंदाजी 

३.५६ – दीपिका कुमारी वि. परनात (महिलांची वैयक्तिक अंतिम ३२ मधील लढत)

४.३५ – दीपिका कुमारी (अंतिम १६ मधील लढत – पात्र ठरल्यास)

९.२८ – रात्री तरुणदीप राय वि. टॉम हॉल (वैयक्तिक अंतिम ३२ मधील लढत)

१०.०७ – तरुणदीप राय (अंतिम १६ मधील लढत – पात्र ठरल्यास)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.