Paris Olympic 2024 : मनु भाकरची २५ मीटर अंतिम फेरी;  दीपिका कुमारी, भजन कौर यांना अखेरची संधी  

Paris Olympic 2024 : मनू भाकेरला २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारारत तिसऱ्या पदकाची संधी आहे 

151
Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक
Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympic 2024) शनिवारी (३ ऑगस्ट) सगळ्यांचं लक्ष मनू भाकेरवरच असेल. ती अंतिम फेरीत पोहोचणार. त्यात पदकासाठी जीव तोडून प्रयत्न करणार, ही गोष्ट आता या ऑलिम्पिकमध्ये परवलीची झाली आहे. त्यातच २५ मीटर एअर पिस्तुल हा तिचा आवडता प्रकार आहे. त्यामुळे इथंही तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर तिरंदाजीत दीपिका कुमारी (Deepika Kumari) आणि भजन कौर (Bhajan Kaur) यांना महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात पदकाची शेवटची संधी आहे. सांघिक आणि मिश्र सांघिक बरोबरच पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Mega Block : रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगा ब्लॉक)

बघूया शनिवारी भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक कसं आहे ते,

नेमबाजी 

१२.३० – रायझा धीलाँ, महेश्वरी चौहान, महिलांचा स्कीट प्रकार पात्रता फेरी

१२.३० – अनंतजीत सिंग नरुका, पुरुषांचा स्कीट प्रकार, दुसरा दिवस, पात्रता फेरी

१.०० – मनू भाकेर, महिलांची २५ मीटर एअर पिस्तुल, अंतिम फेरी

७.०० – संध्याकाळी अनंतजीत सिंग नरुका, पुरुषांच्या स्कीटची अंतिम फेरी (पात्र ठरल्यास)

(हेही वाचा- Jitendra Awhad यांनी सांभाळून बोलावे; गाडीवर हल्ला झाल्यानंतर रोहित पवारांनी दिला सल्ला)

गोल्फ 

१२.३० -शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर यांची पुरुषांच्या स्ट्रोक प्लेची तिसरी फेरी

तिरंदाजी 

१.५२ – दीपिका कुमारी, महिलांची वैयक्तिक रिकर्व्ह अंतिम ८ जणांची फेरी

२.०५ – भजन कौर, महिलांची वैयक्तिक रिकर्व्ह अंतिम ७ जणांची फेरी

४.३० – दीपिका कुमारी व भजन कौर महिलांची उपउपान्त्य लढत (पात्र ठरल्यास)

५.२२ – दीपिका कुमारी व भजन कौर महिलांची उपान्त्य लढत (पात्र ठरल्यास)

६.०३ – दीपिका कुमारी व भजन कौर महिलांची कांस्य पदक लढत (उपान्त्य फेरीत पराभव झाल्यास)

६.१६ – दीपिका कुमारी व भजन कौर महिलांची अंतिम लढत (पात्र ठरल्यास)

(हेही वाचा- Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे मराठीमधील अर्ज मंजूर होणार!)

सेलिंग 

३.५० – विष्णू सर्वानन – पुरुषांची डिंगी ५ व ६ शर्यत

मुष्टीयुद्ध 

१२.१८ – निशांत देव वि. मार्को वेर्दे, पुरुषांच्या ७१ किलो वजनी गटात उपउपान्त्य फेरी

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.