Paris Olympic 2024 : १० मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात मनू आणि सरबजित कांस्य पदकाच्या शर्यतीत, रमिताचं आव्हान संपुष्टात

Paris Olympic 2024 : मनू भाकेर, सरबजित यांनी पात्रता फेरीत तिसरं स्थान मिळवलं आहे. 

168
Paris Olympic 2024 : १० मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात मनू आणि सरबजित कांस्य पदकाच्या शर्यतीत, रमिताचं आव्हान संपुष्टात
  • ऋजुता लुकतुके

१० मीटर एअर रायफल प्रकारात एकेरीत कांस्य पदक जिंकल्यानंतर मनू भाकेर आज लगेचच मिश्र दुहेरीच्या पात्रता फेरीसाठी रेंजवर उतरली. इथेही सरबजित सिंगच्या साथीने तिने सध्या तिसरं स्थान पटकावलं आहे. आता दोघांची कांस्य पदकासाठीची लढत कोरियन जोडीशी होईल. (Paris Olympic 2024)

नेमबाजीच्या सगळ्या स्पर्धा या अटीतटीच्या होत आहेत. आताही मिश्र दुहेरीत पहिल्या चारही जोड्यांमध्ये फक्त एकेका गुणाचा फरक आहे. टर्कीच्या अव्वल जोडीने ५८२ गुण मिळवले आहेत. सर्बियाच्या दुसऱ्या जोडीने ५८१ गुण मिळवले. आता या दोन जोड्या सुवर्ण व रौप्य पदकासाठी मुकाबला करतील. तर तिसऱ्या स्थानावर मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग ही भारतीय जोडी आहे. त्यांनीही ५८० गुण मिळवले आहेत. आता कांस्य पदकासाठी ही जोडी कोरियाच्या ओ ये जिन आणि वोनहो ली या जोडीशी लढेल. कोरियन जोडीने पात्रता फेरीत ५७९ गुण मिळवले आहेत. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Hawkers : अनधिकृत फेरीवाला धंदा करताना आढळल्यास बीट मार्शलवर कारवाई)

१० मीटर एअर रायफल प्रकारात रमिता जिंदाल अंतिम फेरीत तर पोहोचली. पण, अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत रंजिताचे प्रयत्न तोकडे पडले. पहिली सीरिज तिने १०.३, १०.२, १०.६, १०.९ आणि १०.५ असे गुण मिळवले होते. त्यामुळे ती तिसऱ्या क्रमांकावर होती. पण, त्यानंतर बाद फेरी सुरू झाली आणि त्यापूर्वीच्या शेवटच्या सीरिजमध्ये ९.४ गुणांच्या एका फैरीमुळे रमिता थेट सातव्या क्रमांकावर फेकली गेली. तिथून एकदा तिने कमबॅक केलं. पण, सहाव्या आणि सातव्या क्रमांकाच्या लढतीत तिचा पराभव झाला. रमिताला सातव्याच क्रमांकावर समाधान मानावं लागलं. तिच्या पदकाचा आशा संपल्या. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.