- ऋजुता लुकतुके
ऑलिम्पिक ही सर्वोच्च पातळीवरील स्पर्धा का आहे हे दाखवणारी १० मीटर एअर रायफलची पुरुषांची अंतिम फेरी होती. आघाडीचा शेंग लिहाओ सोडला तर बाकीचे सगळे अगदी शेवटपर्यंत एका मिलीमीटरच्या फैरीसाठी झगडत होते. अगदी शेवटच्या सहा फैरी या काही मिलीमीटरच्या अंतराने जिंकल्या आणि हरल्या जात होत्या. अशा या निकराच्या झुंजीत २० वर्षीय भारताच्या अर्जुन बबुताचा चौथा क्रमांक आला. पहिल्या १२ फैरींनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर होता. शेवटच्या दोन फैरीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता. पण, बाद ठरतानाची एक फैर त्याला हरवून गेली. कारण, प्रतिस्पर्धी मिरान मॅरिसिकने १०.५ गुण कमावले. सर्वोच्च गुण कमावता येतात ते १०.९ अशावेळी अर्जुनला दडपण येणं तसं स्वाभाविक होतं. त्याला बरोबरीसाठीही १०.४ गुण हवे होते आणि अशावेळी नेमका तो मिळवू शकला ९.५ बाद फेरीतील ही त्याची सगळ्यात खराब फैर होती. तीच त्याचा घात करून गेली. अर्जुनला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. (Paris Olympic 2024)
🇮🇳💔 𝗛𝗲𝗮𝗿𝘁𝗯𝗿𝗲𝗮𝗸 𝗳𝗼𝗿 𝗔𝗿𝗷𝘂𝗻! It was just not meant to be for Arjun Babuta as he narrowly came up short in the final of the men’s 10m Air Rifle event.
🔫 A 9.9 in his 13th shot proved to be costly for him in the end. He just missed out on a medal finishing 4th.… pic.twitter.com/wJngf0S2Ip
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 29, 2024
(हेही वाचा – Agniveer Yojana : राहुल गांधी यांच्याकडून देशाची दिशाभूल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बरसले)
अखेर २०८.४ गुणांवर अर्जुनची ऑलिम्पिक वारी संपुष्टात आली. चीनचा शेंग लिहाओ २५२.२ गुण मिळवून पहिला आला. तो पहिल्या फैरीपासून अचूक लक्ष्यवेध करत होता. स्वीडनचा लिंडग्रेन दुसरा आला. नेमबाजीत अर्जुन बबुताचं कांस्य पदक थोडक्यात हुकलं. तर तिरंदाजीत उपउपांत्य फेरीत भारतीय पुरुषांनी हाराकिरी केली. (Paris Olympic 2024)
तुर्की हा काही तिरंदाजीतील नावाजलेला संघ नाही. उलट भारताने क्रमवारीच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. पण, रिकर्व्ह सांघिक स्पर्धेत भारताचं आव्हान लगेचच संपुष्टात आलं. तुर्कीबरोबर ६-२ अशा फरकाने भारताने पराभव स्वीकारला. तरुणदीप राय, धीरज बोमेदेवरा आणि प्रशांत जाधव हे तीनही तिरंदाज आपली छाप पाडू शकले नाहीत. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community