Paris Olympic 2024 : मीराबाई चानूचं सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं

Paris Olympic 2024 : ४९ किलो वजनी गटात मीराबाई चौथी आली 

140
Paris Olympic 2024 : मीराबाई चानूचं सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं
Paris Olympic 2024 : मीराबाई चानूचं सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) आणखी एका पदकाने भारताला हुलकावणी दिली आहे. ४९ किलो भारोत्तोलन प्रकारात मीराबाई चानू (Mirabai Chanu) १९९ किलो वजनासह चौथी आली. भारताची चौथी आलेली ती सहावी ॲथलीट ठरली. मीराबाईच्या सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची संधी मात्र हुकली.

(हेही वाचा- जूनपासून अंतराळात अडकलेल्या Sunita Williams २०२५ मध्ये परतणार)

मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचललं होतं. तर, दुसऱ्या प्रयत्नात मीराबाई चानूनं ८८ किलो वजन उचललं. स्नॅच प्रकारात मीराबाई चानूनं ८८ किलो वजन उचललं. तर, क्लीन अँड जर्क प्रकारात मीराबाई चानूचे दोन प्रयत्न अयशस्वी ठरले. तिनं क्लीन अँड जर्क मध्ये १११ किलो वजन उचललं. यामुळं तिनं उचललं एकूण वजन १९९ किलो झालं. या स्पर्धेत चीनच्या खेळाडूनं सुवर्ण पदक, रोमानियाच्या खेळाडूनं रौप्य पदक मिळवलं. थायलँडच्या खेळाडूला कांस्य पदक मिळवलं. मीराबाई चानू चौथ्या स्थानावर राहिली आणि भारताची पदकाशी आशा फोल ठरली. (Paris Olympic 2024)

मीराबाई चानूनं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत २०२ किलो वजन उचलून रौप्य पदकावर नाव कोरलं होतं. मीराबाईनं स्नॅचमध्ये ८५ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११५ किलो वजन उचलून भारतासाठी पहिलं पदक मिळवून दिलं होतं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Vinesh Phogat Appeal : विनेश प्रकरणी आता सपोर्ट स्टाफची चौकशी होणार, क्रीडा लवादाकडेही दाद )

मीराबाई चानू (Mirabai Chanu) पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचली असली तरी तिच्या पुढं फिटनेसचं आव्हान असेल. मीराबाई चानूला गेल्या काही काळात दुखापतींचा सामना करावा लागला होता. त्यामुळं तिनं काही स्पर्धांमध्ये सहभाग घेतला नव्हता. (Paris Olympic 2024)

मीराबाई चानू (Mirabai Chanu) सोबत अंतिम फेरीत जपानची आर. सुझूकी, चीनची झेड.एच. होऊ, मादगास्करची आर. रँडफिरसन, डोमेनियन रिपब्लिकची बी. पिरोन, थाईलँडची एस. खम्बाओ, गुहामची एन. लगताओ, रोमानियाची एमवी.कमेबीई, अमेरिकेची जे. डेलाक्रुझ, वेनेझुएलाची के. एचानदिया, चायनीज तैपेईची डब्ल्यू. एल फंग आणि बेल्जियमच्या एन. स्टेरकक्स यांनी देखील सहभाग घेतला. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Pune Ammonia Gas Leak: पुण्यातील कारखान्यातून अमोनिया वायूची गळती सुरू, १७ कर्मचारी रुग्णालयात)

भारताचा टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. या वेळी देखील त्याच्याकडून भारताला पदकाच्या आशा आहेत. याशिवाय भारताला हॉकीमध्ये कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. भारत आणि स्पेनं यांच्यात कांस्य पदकासाठी लढत होणार आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.