- ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंदाजीचा संघ त्यांचे राष्ट्रीय प्रशिक्षक दक्षिण कोरियाचे वूंग की आणि आणि हाय परफॉर्मन्स संचालक संजीवा सिंग यांच्या मदतीशिवायच खेळणार आहे. या दोघांना ऑलिम्पिक असोसिएशनने आपल्या सपोर्ट स्टाफच्या ताफ्यात स्थानच दिलेलं नाही. आणि विशेष म्हणजे वेगवेगळे आरोप झालेले अरविंद यादव मात्र संघाबरोबर असणार आहेत. या सावळ्या गोंधळावर सगळीकडून टीका होत आहे. (Paris Olympic 2024)
अरविंद यादव यांनी युवा राष्ट्रकूल स्पर्धेत एका कॅनडाच्या ॲथलीट विरोधात गैरवर्तन केलं होतं. ते प्रकरण गाजलंही होतं. असं असताना अरविंद यादवचा समावेश व्हावा यासाठी या दोघांना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. वूंग की यांनी रविवारीच या प्रकरणाला वाचा फोडली होती. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा – India’s Tour of Sri Lanka : भारताचा टी-२० संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना; गंभीर म्हणतो, राहुल द्रविडची जागा घेणं कठीण)
‘मी पॅरिसला खेळाडूंबरोबर नसेन तर त्यांना पदक मिळणं जवळपास अशक्य आहे. मला पॅरिसला न नेण्याचा ऑलिम्पिक असोसिएशनचा निर्णय मूळातच चूक आहे. इतक्या अपमानानंतर मी भारतीय संघाबरोबर राहू इच्छित नाही. मी साई केंद्रात परत जाऊन सामानाची आवरा आवर सुरू करणार आहे. ऑगस्टमध्ये मुदत संपली की, मी कोरियाला परतणार,’ असं वूंग की यांनी भारतीय मीडियाशी बोलताना म्हटलं होतं. (Paris Olympic 2024)
दुसरीकडे भारतीय तिरंदाजी असोसिएशनने या गोंधळासाठी ऑलिम्पिक असोसिएशनला जबाबदार धरलं आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने १३ जणांचा वैद्यकीय चमू पथकाबरोबर धाडण्याचा निर्णय घेतला आहे. या चमूमध्ये फीजिओ, डॉक्टर, झोप या विषयातील तज्ज्ञही आहेत. या अतिरिक्त १३ जणांमुळे काही खेळांना आपली सपोर्ट स्टाफची संख्य कमी करावी लागली असा तिरंदाजी असोसिएशनचा दावा आहे. भारतीय तिरंदाजी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेलं नाही. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community