Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक उद्गाटनाच्या कार्यक्रमात हिंदीचा गौरव पाहून नेटकरी सुखावले

Paris Olympic 2024 : उद्गाटन सोहळ्यातील सात प्रमुख भाषांमध्ये एक हिंदी भाषा होती.

133
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक उद्गाटनाच्या कार्यक्रमात हिंदीचा गौरव पाहून नेटकरी सुखावले
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा अतिशय रंगतदार आणि फ्रेंच परंपरा तसंच फॅशन, सौदर्य व कलासक्ती याकडे फ्रेंच लोकांचा असलेला ओढा दाखवून देणारा हा सोहळा होता. पॅरिसमधील ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने आणि सेन नदीलाच ऑलिम्पिक मैदान बनवून खेळाडूंचं संचनल पार पडलं. २०५ राष्ट्रीय संघ आणि १ निर्वासितांचा संघ अशा ६,५०० खेळाडूंनी सेन नदीवरून संचलन केलं आणि ३३ व्या ऑलिम्पिक सोहळ्याला सुरुवात झाली. (Paris Olympic 2024)

या सोहळ्यात हिंदी भाषेचाही गौरव झाला. कारण, सोहळ्यादरम्यान दाखवलेल्या ग्राफिक्समध्ये अधिकृत ७ भाषांपैकी एक भाषा हिंदी होती. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी बनवल्या कागदी पिशव्या)

हिंदीचा ऑलिम्पिक उद्गाटनात झालेल्या समावेशामुळे सोशल मीडियावर कौतुकाची लहर उमटली आहे. अनेकांनी ट्विटरवर आपला आनंद शेअर केला आहे. ‘महिलांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,’ अशी शपथ ऑलिम्पिक उद्गाटन सोहळ्यात सगळ्यांना देण्यात आली. या सिस्टरहूड कार्यक्रमात हिंदी भाषेचाही वापर झाला. (Paris Olympic 2024)

भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. शनिवारपासूनच खेळाडूंच्या पदक फेऱ्या सुरू होणार आहेत. यंदा टोकयो ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या ७ पदकांचा आकडा पार करण्याचं उद्दिष्टं भारतीय खेळाडूंनी ठेवलं आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.