- ऋजुता लुकतुके
२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमधील (Paris Olympic 2024) नेमबाजीतील सुवर्णविजेता खेळाडू अभिनव बिंद्राने (Abhinav Bindra) पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान ज्योत रिलेत भाग घेतला. हा क्रीडा आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव असल्याचं त्याने बोलून दाखवलं आहे. ‘हा खेळाडू म्हणून अभिमानाचा क्षण आहे. तसंच ऑलिम्पिकच्या भव्यतेसमोर नतमस्तक करणारा क्षण आहे,’ अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.
(हेही वाचा- Ganpati Special Trains : पश्चिम रेल्वेकडून गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर; जरुर वाचा)
अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) हा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. २००८ मध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात त्याने ही किमया केली. या विजेतेपदानंतर तो भारताच्या ऑलिम्पिक चळवळीतही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनबरोबर सक्रिय आहे. त्यासाठीच अलीकडे त्याला ऑलिम्पिक ऑर्डर जाहीर झाली आहे. आता गुरुवारी तो ऑलिम्पिक ज्योतीच्या रिलेत सहभागी झाला होता. (Paris Olympic 2024)
ट्विटरवर हा फोटो शेअर करत त्याने एक भावपूर्ण संदेशही लिहिला आहे.
Carrying the Olympic flame yesterday in the Paris 2024 Torch Relay was an honor beyond words. 🌟 The spirit of the Games lives in each of us, and I am humbled to be part of this incredible journey. Let’s continue to inspire, dream, and achieve together! 🇮🇳🔥 #Paris2024 pic.twitter.com/6f9oEiWu61
— Abhinav A. Bindra OLY (@Abhinav_Bindra) July 25, 2024
‘मी शब्दांत मांडू शकत नाही, इतका मोठा तो अभिमानाचा क्षण होता. ऑलिम्पिक ज्योतीच्या रिलेत मला सहभागी होता आलं. खेळात एक प्रकारचं चैतन्य आहे. ते आपल्या सगळ्यांमध्ये असतं. खेळांच्या एका मोठ्या प्रवासात सहभागी होता आलं यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. सगळे मिळून ही मोहीम पुढे सुरू ठेवूया,’ असं अभिनवने या संदेशात म्हटलं आहे. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार : CM Shinde)
शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. त्यानंतर ११ ऑगस्टपर्यंत खेळांचा हा कुंभमेळा सुरू राहील. भारताकडून ११७ खेळाडू या स्पर्धेत आपलं नशीब आजमावणार आहेत. शरथ कमल (Sharath Kamal) आणि पी व्ही सिंधू (P.V. Sindhu) हे खेळाडू भारतीय पथकाचं नेतृत्व करतील. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community