Paris Olympic 2024 : तिरंदाजीच्या पुरुष व महिला संघांना ऑलिम्पिक कोटा

जागतिक क्रमवारीच्या निकषावर भारतीय संघांना पॅरिसचं तिकीट मिळालं आहे.

141
Paris Olympic 2024 : तिरंदाजीच्या पुरुष व महिला संघांना ऑलिम्पिक कोटा
Paris Olympic 2024 : तिरंदाजीच्या पुरुष व महिला संघांना ऑलिम्पिक कोटा
  • ऋजुता लुकतुके

जागतिक तिरंदाजी संघटनेनं सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या संघ क्रमवारीनंतर भारतीय महिला व पुरुष संघांचा पॅरिस ऑलिम्पिकमधील (Paris Olympic 2024) सहभाग निश्चित झाला आहे. आतापर्यंत विविध स्पर्धांमधून कोटा न मिळवलेल्या संघांमध्ये भारतीय महिला संघ पहिला होता. भारताबरोबरच इंडोनेशियालाही ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं आहे. तर पुरुषांमध्ये भारत आणि चीन हे देश पात्र ठरले.

ऑलिम्पिकमध्ये सांघिकच्या सर्व प्रकारात प्रत्येकी १२ संघ सहभागी होतील. तर मिश्र सांघिक प्रकारात प्रत्येकी ५ संघ असतील. जागतिक तिरंदाजी संघटनेनं यंदा ऑलिम्पिक पात्रतेसाठी थोडे वेगळे निकष आखले होते. सांघिक प्रकारात गेल्यावर्षीपासून पात्रता स्पर्धा सुरू झाल्या. गेल्यावर्षी जर्मनीत बर्लिनमध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेत पुरुषांमध्ये दक्षिण कोरिया, टर्की आणि जपान हे संघ पात्र ठरले. तर महिलांमध्ये जर्मनी आणि मेक्सिको हे संघ पात्र ठरले. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Ashok Leyland : प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या 100 बसगाड्या अशोक लेलँडच्या सर्व्हीस सेंटरमध्ये जमा)

या जागतिक स्तरावरील पात्रता स्पर्धेनंतर खंडांच्या स्तरावर पात्रता स्पर्धा सुरू झाल्या. आशिया खंडात कझाकिस्तान, दक्षिण कोरियाचे संघ पात्र ठरले. अमेरिकन खंडात कोलंबिया आणि अमेरिका तर युरोपात नेदरलँड्स आणि इटली हे संघ पॅरिसमध्ये खेळणार हे निश्चित झालं. शेवटची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा अंतालया इथं पार पडली. आणि या स्पर्धेतून चीन, मलेशिया, ग्रेट ब्रिटन आणि चीन-तैपेई या संघांना पॅरिसचं तिकीट मिळालं. (Paris Olympic 2024)

या संघांना पात्रता मिळाल्यानंतर जागतिक क्रमवारीनुसार अव्वल १२ मधील उर्वरित दोन संघांना पुरुष आणि महिला गटात पात्रता मिळाली. भारतीय संघात तरुणदीप राय आणि दीपिका कुमारी हे दोन भारताचे मुख्य खेळाडू असतील.

भारतीय पुरुष संघ तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा व प्रवीण जाधव
भारतीय महिला संघ दीपिका कुमारी, भजन कौर व अंकिता भाकट

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.