- ऋजुता लुकतुके
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष पी. टी. उषाला (P. T. Usha) पॅरिस ऑलिम्पिकसाठी (Paris Olympic 2024) पात्र ठरलेल्या खेळाडूंकडून मोठी अपेक्षा आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ किमान १० पदकं पटकावेल अशी आशा त्यांना वाटते. भारताची ऑलिम्पिक तयारी, पदकांची आशा आणि भारताची २०३६ च्या ऑलिम्पिक (Olympics) आयोजनाची दावेदारी याविषयी उषा यांनी अलीकडेच टाईम्स वृत्त समुहाशी संपर्क साधला. एकूण ११५ ते १२० खेळाडू पॅरिसला जातील आणि यातून भारताला किमान १० पदकांची अपेक्षा असेल असा विश्वास उषा यांनी या मुलाखतीत बोलून दाखवला. (Paris Olympic 2024)
‘मला खेळाडूंचं नाव घेऊन त्यांच्यावर दडपण वाढवायचं नाही. पण, टोकयोमध्ये मिळवली त्यापेक्षा जास्त पदकं आपण यंदा जिंकू असं मला नक्की वाटतं. आणि पदकाची अपेक्षा असलेल्या खेळाडूंवर आम्ही खास लक्ष देत आहोत. सरकारने मागची काही वर्षं या खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळवून देण्यावर लक्ष दिलं आहे,’ असं उषा म्हणाल्या. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- General Insurance : विमा दाव्यांच्या पूर्ततेसाठी विमा नियामक मंडळाने आणले ‘हे’ नवीन नियम)
त्याचबरोबर २०३६ च्या ऑलिम्पिक (Olympics) दावेदारीवरही त्यांनी भाष्य केलं. ‘आयोजन मिळवण्याचे ३ टप्पे असतात. पहिला टप्पा असतो तो आयोजनाच्या दावेदारीचा. तो टप्पा पार झाला आहे. आता आंतरराष्ट्रीय परिषदेबरोबर सातत्याने संवाद साधण्याचा टप्पा सुरू झाला आहे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात ठोस संवाद सुरू होईल. आता पॅरिसला जाणाऱ्या शिष्टमंडळात खेळाडूंच्या सपोर्ट स्टाफबरोबरच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची विशेष टीमही जाणार आहे. ही टीम आंतरराष्ट्रीय परिषदेबरोबर आणि इतर देशांच्या असोसिएशनबरोबर संवाद साधण्याचं काम करेल. केंद्रसरकार ऑलिम्पिक यजमानपदाबद्दल गंभीर आहे. त्यामुळे त्यांच्या सहकार्याने आपण पूर्ण प्रयत्न त्यासाठी करू,’ असं पी. टी. उषाला (P. T. Usha) यांनी स्पष्ट केलं. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community