-
ऋजुता लुकतुके
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकलेला सरबज्योत सिंग (Sarabjot Singh) स्पर्धा संपल्यानंतर गुरुवारी मायदेशात परतला आहे. दोनच दिवसांपूर्वी मनू भाकेरच्या (Manu Bhaker) साथीने त्याने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र सांघिक कांस्य पदक जिंकलं आहे. त्यासाठी ओह ये जिन आणि वेनहो ली या कोरियन जोडीचा त्यांनी १६-१० ने पराभव केला. या स्पर्धेत भारताने पटकावलेलं हे दुसरं पदक ठरलं. तर पिस्तुल प्रकारात पुरुष नेमबाजाने मिळवलेलं हे आतापर्यंतचं पहिलंच पदक आहे. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये! CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंना टोला)
दुसरीकडे, मनू भाकेरने (Manu Bhaker) एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वतंत्र भारतात असा पराक्रम करणारी ती पहिली ॲथलीट आहे. तर गुरुवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसाळेनं (Swapnil Kusale) कांस्य जिंकलं आहे. त्यामुळे नेमबाजी प्रकारात भारतीय खेळाडू सध्या पदक विजेती कामगिरी करत आहेत. (Paris Olympic 2024)
पण, पदक विजेत्यांपैकी मायदेशात परतणारा सरबज्योत (Sarabjot Singh) हा पहिला खेळाडू आहे. त्यामुळे त्याचं जल्लोषात स्वागत नवी दिल्लीत करण्यात आलं. (Paris Olympic 2024)
#WATCH | Olympic medalist Sarabjot Singh, who won bronze in #ParisOlympics2024, receives a warm welcome at the Delhi airport. pic.twitter.com/VSyUYRbnht
— ANI (@ANI) August 1, 2024
ढोल ताशांच्या गजरात त्याची मिरवणूक निघाली. त्याच्यावर फुलांची उधळणही करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी त्याने क्रीडामंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांची भेट घेतली. (Paris Olympic 2024)
#WATCH | Union Sports Minister Mansukh Mandaviya felicitates Olympic medalist Sarabjot Singh, who won bronze in the 10m Air Pistol Mixed team event at #ParisOlympic2024 pic.twitter.com/Ilg5KcrIlP
— ANI (@ANI) August 1, 2024
मनसुख मांडवीय यांनी यावेळी पॅरिसमधून परतलेल्या सहाही नेमबाजांची भेट घेतली. पदक विजेत्या सरबज्योतला २२.५ लाख रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून दिला. सरबज्योतचे कुटुंबीयंही यावेळी उपस्थित होते. या सत्कारानंतर सरबज्योत त्याचं गाव अंबालाला रवाना झाला आहे. तिथेही त्याच्यासाठी मोठा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community