Paris Olympic 2024: कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जग जिंकलं! नेमबाज Swapnil Kusale ला मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट! 

173
Paris Olympic 2024: कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जग जिंकलं! नेमबाज Swapnil Kusale ला मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट! 
Paris Olympic 2024: कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जग जिंकलं! नेमबाज Swapnil Kusale ला मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट! 

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) यांनी जगभरात महाराष्ट्राचं नाव रोशन केलं आहे. नेमबाज स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात 1 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे. भारतासाठी स्वप्निलने या 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात पदक जिंकणारा एकमेव खेळाडू हा बहुमान मिळवला आहे. याच कामगिरीबद्दल मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर पदावर कार्यरत असलेले नेमबाज स्वप्नील कुसाळे यांना ऑफिसर पदावर बढती देण्यात येणार आहे.  (Swapnil Kusale)

मध्य रेल्वेकडून स्वप्नीलसाठी मोठं गिफ्ट 

स्वप्निल कुसाळे यांनी इतिहास रचलेला आहे. ७२ वर्षानंतर एका मराठी मुलाला ऑलिंपिकमध्ये पदक मिळालेले आहे मात्र हा स्वप्निल सध्या मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हिजन मध्ये टीसी म्हणून काम करतोय. यामुळेच मध्य रेल्वेसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. (Swapnil Kusale)

(हेही वाचा – Samsung कडून ‘इंडिया चीअर्स फॉर नीरज’ मोहिमेची घोषणा)

ज्यावेळेस स्वप्निल हा पॅरिस हून भारतात येईल त्यावेळेस भारतीय रेल्वेकडून त्याचा यथोचित सन्मान केला जाईल आणि ताबडतोब त्याला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार आहे, अशी घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव (Central Railway General Manager Ram Karan Yadav) यांनी केली. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीस देखील जाहीर करणार आहेत, त्यामुळे आता स्वप्निल हा मध्य रेल्वेचा एक ऑफिसर म्हणून यापुढे काम करेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी जाहीर केले आहे. तसेच मध्य रेल्वेची अंकिता ध्यानी (Ankita Dhyani) ही देखील ऑलम्पिकसाठी पॅरिसला गेली असल्याने तिला देखील राम करण यादव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (Swapnil Kusale)

(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ‘भारतभाग्यविधाता’; माजी राष्ट्रपती Ram Nath Kovind यांचे प्रतिपादन)

स्वप्नीलने इतिहास रचला

भारताच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारतीय नेमबाजाने प्रथमच पदक जिंकले आहे. सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. स्वप्नीलने एकूण 451.4 गुण मिळवले. (Swapnil Kusale)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.