Paris Olympic 2024 : पी व्ही सिंधू, शरथ कमल भारतीय पथकाचे ध्वजवाहक

Paris Olympic 2024 : २०२० पासून उद्घाटनाच्या सोहळ्यात महिला व पुरुष असे दोघे खेळाडू ध्वजवाहक असतात. 

138
Paris Olympic 2024 : पी व्ही सिंधू, शरथ कमल भारतीय पथकाचे ध्वजवाहक
  • ऋजुता लुकतुके

आगामी पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात आपलं सहावं ऑलिम्पिक खेळणारा टेबलटेनिसपटू शरद कमल आणि ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू पी व्ही सिंधू असे दोघे भारतीय पथकाचं नेतृत्व करणार आहेत. ध्वजसंचलनाचा मान या दोघांना मिळाला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी टी उषाने सोमवारी ही घोषणा केली आहे. ‘शरथ कमलच्या बरोबरीने दोन ऑलिम्पिक पदकंविजेती पी व्ही सिंधूही भारताची ध्वजवाहक असेल हे जाहीर करताना मला आनंद होतं आहे. भारतीय पथकाची तयारी चांगली झाली आहे. त्यामुळे भारताला नक्कीच चांगलं यश मिळेल,’ असं पी टी उषा यांनी हा निर्णय मीडियाला कळवताना म्हटलं आहे. (Paris Olympic 2024)

या वर्षाच्या सुरुवातीलाच शरथ कमलचं नाव ऑलिम्पिक असोसिएशनने जाहीर केलं होतं. पण, महिला ध्वजवाहकाचं नाव अजूनपर्यंत ठरलं नव्हतं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Govt Scheme: शासकीय योजनांच्या प्रचारासाठी ५० हजार योजनादूत नियुक्त करणार; नेमकं काय करणार कार्य ? वाचा सविस्तर…)

२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने उद्गाटन समारंभाच्या नियमावलीत बदल केले. त्यानुसार, पुरुष ध्वजवाहक खेळाडूच्या बरोबरीने एक महिला ध्वजवाहक नेमणं अनिवार्य केलं. त्यानुसार, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने कमलबरोबर आता सिंधूचीही निवड केली आहे. या निर्णयाबरोबरच भारतीय पथकाचा ऑलिम्पिक शेफ दी मिशन म्हणून आता मेरी कोमच्या जागी गगन नारंगची नियुक्ती झाली आहे. (Paris Olympic 2024)

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० च्या वर खेळाड़ू सहभागी होणार आहेत. २६ जुलैपासून सुरू होणारी ही स्पर्धा ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. २०२० च्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने ७ पदकं जिंकली होती. यावेळी पदकांची संख्या दुहेरी असावी असं उद्दिष्टं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने ठेवलं आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.