Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकमध्ये अगदी दुसऱ्या फेरीतही आमनेसामने येऊ शकतात नदाल आणि जोकोविच 

Paris Olympic 2024 : जोकोविचने आधीच आपण सुवर्ण पदकासाठी खेळत असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

186
Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकमध्ये अगदी दुसऱ्या फेरीतही आमनेसामने येऊ शकतात नदाल आणि जोकोविच 
  • ऋजुता लुकतुके

राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच हे टेनिसमधील सर्वकालीन दिग्गज खेळाडूंपैकी दोन खेळाडू आहेत. त्यांची वेगळी ओळख द्यायला नको. दोघंही सध्या वयोमानानुसार दुखापतींशी झगडत आहेत. पण, जिद्दीने ऑलिम्पिकमध्ये उतरणार आहेत. आणि दोघांसाठी पहिली फेरी मनासारखी गेली तर अगदी दुसऱ्या फेरीतच हे दोन दिग्गज खेळाडू आमने सामने येऊ शकतील. दोघांचा ड्रॉ एकच आहे. जोकोविचची पहिल्या फेरीत लढत रोबन बोपान्नचा दुहेरीतील साथीदार मॅथ्यू एबडनबरोबर आहे. तर नदालची लढत मार्टन फस्कोविक्सशी आहे. (Paris Olympic 2024)

आणि दोघांनी आपापले सामने जिंकले तर तेच एकमेकांसमोर उभे ठाकतील. पॅरिसमधील रोलँड गॅरोसवरच ऑलिम्पिकचे सामने होणार आहेत. क्ले कोर्टवर नदालने अख्ख्या कारकीर्दीत वर्चस्व गाजवलं आहे. तब्बल १४ वेळा त्याने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. पण, यावेळी जोकोविच विरुद्ध परिस्थिती वेगळी असेल. यावेळी पायाच्या दुखापतीने तो बेजार झालाय. आणि सलग एक महिना तो खेळूही नाही शकलेला. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Recruitment Scam : मुंबई अग्निशमन दल फायरमन भरती घोटाळा; मनपाच्या २ लिपिकांसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल)

जोकोविच विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. पण, तिथे गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला सरळ सेटमध्येत सामना गमवावा लागला. त्यामुळे या क्षणी दोघांमध्ये जोकोविचचं पारडं जड दिसतंय. पण, ऑलिम्पिकचं आव्हान त्याच्यासाठीही कठीणच आहे. स्पेनच्या ३७ वर्षीय नदालने यापूर्वी २००८ मध्ये सुवर्ण तर २०१६ मध्ये दुहेरीतील सुवर्ण पटकावलं होतं.(Paris Olympic 2024)

तर नोवाक जोकोविच आतापर्यंत ४ ऑलिम्पिक खेळला आहे. पण, २००८ चं कांस्य पदक वगळता त्याने पदकांची कमाई केलेली नाही. त्यामुळे यंदा ते अपयश धुवून काढण्यासाठी तो खेळणार आहे. आपण सुवर्ण पदक जिंकण्यासाठीच खेळणार असल्याचं त्याने स्पर्धेपूर्वीच जाहीर केलं आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.