Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचं विक्रमी तिकीट विक्री 

Paris Olympic 2024 : आतापर्यंत ऑलिम्पिकची ८६ लाख तिकीटं विकली गेली आहेत 

150
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचं विक्रमी तिकीट विक्री 
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचं विक्रमी तिकीट विक्री 
  • ऋजुता लुकतुके 

पॅरिस ऑलिम्पिकमधील (Paris Olympic 2024) स्पर्धा हाऊसफुल्ल गर्दीत पार पडणार अशी चिन्ह दिसत आहेत. स्पर्धेला अजून १५ दिवस अवकाश असताना तिकीट विक्रीचा आधीच विक्रम मोडला गेला आहे. आतापर्यंत पॅरिसमध्ये ८६ लाख तिकिटं विकली गेली आहेत. आणि १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकचा विक्रम त्यामुळे मागे पडला आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेचीही १० लाख तिकिटं खपली आहेत.

(हेही वाचा- Gautam Gambhir : गंभीरच्या पसंतीच्या सपोर्ट स्टाफवर बीसीसीआयची फुली?)

२०२४ स्पर्धेचे मुख्य आयोजक टोनी एस्टांग यांनी तिकिट विक्रीची आकडेवारी मीडियाला सादर केली. ‘१९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिक दरम्यान खेळांची ८३ लाख तिकिटं विकली गेली होती. तो आकडा आम्ही आताच पार केला आहे,’ असं टोनी म्हणाले. हा आकडा पुढे जाऊन १ कोटींवर पोहोचेल असा विश्वासही टोनी यांना वाटतो आहे. (Paris Olympic 2024)

ऑलिम्पिक हा क्रीडा क्षेत्रातील सगळ्यात मोठा महोत्सव आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकसाठीची तिकीट विक्री आता अंतिम टप्प्यात आली आहे. या टप्प्यात लोकांना हंगामी पास तसंच एक किंवा दोन खेळांचे एकत्र पास दिले जात आहेत. ऑलिम्पिक नगरीचं एका दिवसाचं तिकीटही यात उपलब्ध असेल. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- IAS Pooja Khedekar: पूजा खेडेकर मानसिक आजारी! कोणत्या जिल्हा रुग्णालयाने दिलं होतं सर्टिफिकेट? )

ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारांना लोकांची सर्वाधिक मागणी असल्याचं टोनी यांनी सांगितलं आहे. तर ऑलिम्पिक स्टार खेळाडूंना बघण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतील असा अंदाज आहे. ऑलिम्पिक स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान तर पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान पॅरिसमध्ये होत आहेत. १०७ देशांचे हजारो ॲथलीट या स्पर्धेत भारत घेत आहेत.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.