Paris Olympic 2024 : ऑलिम्पिक नगरीत क्रीडा ग्रामचं अनावरण; चीन, ऑस्ट्रेलिया इथं येणारे पहिले संघ

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला आता एक आठवडा बाकी आहे 

157
Paris Olympic 2024 : मनू व सरबज्योत यांची कांस्य पदकाची लढत आणि मंगळवारचं भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक
Paris Olympic 2024 : मनू व सरबज्योत यांची कांस्य पदकाची लढत आणि मंगळवारचं भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकच्या क्रीडानगरीत ऑस्ट्रेलिया (Australia) आणि ब्राझीलचं (Brazil) पहिलं पथक गुरुवारी दाखल झालं आहे. आणि त्यामुळे क्रीडानगरी किंवा ॲथलीट व्हिलेजचं उद्घाटनही पार पडलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पॅरिस शहर आता ऑलिम्पिकसाठी गजबजेल. शहराच्या उत्तरेला ही क्रीडानगरी आहे. आणि इथं १४,००० लोकांच्या निवासाची सोय आहे. यातील ९,००० खेळाडू असतील.  (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- राज्य सरकारला मोठा दणका; RTE प्रवेशाबाबतचा अध्यादेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द)

स्पर्धेचा उद्गाटन सोहळा २६ जुलैला सेन नदीच्या काठावर होणार आहे. यावेळी पहिल्यांदा उद्घाटन सोहळा स्टेडिअमवर न होता शहरात खुल्या वातावरणात होणार आहे. आणि त्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असलं तरी आयोजक कसून तयारी करत आहेत. (Paris Olympic 2024)

यंदा क्रीडानगरीत एक विशेष अभियांत्रिकी प्रयोग करण्यात आला आहे. पॅरिसमध्ये सध्या उन्हाळा आहे. पण, क्रीडानगरीची रचना अशी आहे की, वातानुकुलन यंत्रणेशिवाय इथं तापमान बाहेरच्या जगापेक्षा ६ अंश सेल्सिअसने कमी राहू शकतं. शिवाय या नगरीतील घरं ही कमीत कमी कार्बन उत्सर्जन होईल या पद्धतीने बांधली आहेत. आणि पॅरिस ऑलिम्पिक पार पडलं की, क्रीडानगरी एका गृह प्रकल्पामध्ये बदलेल. आणि शहरातील कनिष्ट वर्गासाठी ही घरं उपलब्ध करून देण्यात येतील. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू बॉलिवूड स्टारपेक्षाही जास्त; रणवीर, शाहरुखला टाकलं मागे )

स्पर्धेचा उद्घाटन सोहळाही खास असणार आहे. बंदिस्त मैदानात हा सोहळा न होता सेन नदीवर खेळाडू बोटींवरून ऑलिम्पिक परेड करणार आहेत. त्यासाठी मध्य पॅरिस जवळ जवळ लॉकडाऊनमध्ये आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून हा लॉकडाऊन सुरू झाला आहे. सेन नदीच्या भोवती ६ किलोमीटरचा परिसर हा ग्रे झोन असेल. आणि इथं राहणारे नागरिक, पर्यटक यांना सुरक्षा पासशिवाय बाहेर फिरता येणार नाहीए. उद्घाटन सोहळ्यापर्यंत ही परिस्थिती असेल. (Paris Olympic 2024)

पॅरिस ऑलिम्पिक आयोजनासाठी तयार झालं आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.