- ऋजुता लुकतुके
भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदकाच्या सामन्यात स्पेनचा २-१ ने पराभव करत सलग दुसरं ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकलं. त्यानंतर रविवारी हॉकी संघ मायदेशी परतला. अमृतसर विमानतळावर भारतीय खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल ताशे आणि भांगडा नृत्यासह हवेत गुलालही उधळण्यात आला. संघातील खेळाडूंचे कुटुंबीय त्यांच्या स्वागतासाठी हजर होतेच. शिवाय पंजाबचे क्रीडामंत्री कुलदीपसिंग धालिवाल आणि काँग्रेसचे खासदार गुरप्रीत सिंगही आले होते. कांस्य विजेत्या खेळाडूंना हार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. (Paris Olympic 2024 )
भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत हा अमृतसर जवळच्या तिमोवाल गावातील आहे. स्पर्धेत १० गोल करत हरमनप्रीतने भारतीय विजयात मोलाची भूमिका बजावली.
VIDEO | “We are really happy. It is a very proud moment for us. People who feel the happiest are the parents. Ever since I left home, I have always been supported by my parents, and that is what has mattered to me the most. I am really happy that I brought a medal home,” says… pic.twitter.com/UKdHjIZPeY
— Press Trust of India (@PTI_News) August 11, 2024
(हेही वाचा – Crime : घुसखोर बांगलादेशी महिलांसह ५ जणांना अटक; २५ वर्षांपासून होते बेकायदेशीर वास्तव्यास)
खेळातही देश पुढे जावा – हरमनप्रीत
२८ वर्षीय हरमनप्रीतला कौतुकाने सरपंच म्हटलं जातं. हॉकीची लोकप्रियता देशात वाढावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली. ‘आम्ही आमच्या खेळाने असा प्रयत्न करू की, हॉकीला देशात गतवैभव मिळेल. सलग दोन ऑलिम्पिक पदकांमुळे तरुण या खेळाकडे वळतील असा विश्वास वाटतो. आता मुलांनी शिक्षणाबरोबरच खेळांना महत्त्व द्यावं आणि खेळातही देश पुढे जावा एवढीच इच्छा आहे,’ असं हरमनप्रीत पीटीआयशी बोलताना म्हणाला.
सत्कारानंतर खेळाडूंनी अमृतसरला सुवर्ण मंदिरातही भेट दिली. हरमनप्रीतबरोबरच मनप्रीत, मनदीप, जरमनप्रीत, समशेर, गुरजंत सिंग आणि हार्दिक सिंग या सोहळ्यात सहभागी झाले होते. (Paris Olympic 2024 )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community