- ऋजुता लुकतुके
बंदिस्त मैदानाऐवजी ऐतिहासिक सेन नदीवर पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. आणि खेळाडूंचं संचलनही बोटींमधून पार पडणार आहे. सेन नदीच्या एका टोकावरून खेळाडू बोटींवरून निघतील आणि ते आयफेल टॉवरपाशी येतील. हा उद्घाटन सोहळा नेमका कसा होणार हे आयोजकांनी सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे जाहीर केलेलं नाही. पण, त्याची कल्पना तयारी पाहता आपल्याला येऊ शकते. (Paris Olympic 2024)
‘गेम्स वाईड ओपन,’ किंवा ‘खेळ आता सुरू झाला आहे,’ अशी या स्पर्धेची कॅचलाईन आहे. आयोजक त्याच पद्धतीने काम करत आहेत. कारण, उद्घाटन सोहळ्यालाच दहशतवादी हल्ल्याची धमकी आली आहे. त्यामुळे आयोजक डोळ्यात तेल घालून सगळ्या गोष्टींची पाहणी करत आहेत. पॅरिस शहर हे दर्दी लोकांचं शहर आहे. आणि पॅरिसच्या लौकिकाला साजेसं संगीत, नृत्य आणि माहौल आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. सेन नदीचा ६ ते ७ किलोमीटरचा रस्ता ६००० ते ७,००० खेळाडू या संचलनात ओलांडणार आहेत. त्यासाठी ८५ बोटी तयार ठेवण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे असतील. (Paris Olympic 2024)
Quelle journée encore pour la Flamme Olympique !
Merci à tous les habitants du Val-de-Marne, votre énergie était communicative. Encore une journée avec des porteurs d’exception et des milliers de sourires 🔥
On revient demain, toujours en direct sur @FranceTV📸 Paris 2024 /… pic.twitter.com/QGVM50BAuf
— Paris 2024 (@Paris2024) July 21, 2024
(हेही वाचा – NPS Vatsalya Scheme : मुलांचे भविष्य सुरक्षित करणारी ‘एनपीएस-वात्सल्य’ योजना काय? अर्थसंकल्पात केली घोषणा)
पाण्याखाली सादरीकरण करण्याची थॉमस जॉली यांची इच्छा
अर्थात, तिकीटं खरेदी करूनच हा उद्घाटन सोहळा लोकांना बघावा लागेल. आणि त्यासाठीचं तिकीट २,७०० युरोंपर्यंत पोहोचलं आहे. उद्घाटन सोहळ्याचा रंगारंग कार्यक्रम प्रसिद्ध फ्रेंच संगीतकार रॉक ऑपेराचे नावाजलेले कलाकार थॉमस जॉली यांनी बसवला आहे. ३,००० नर्तक, गायक आणि कलाकार या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. (Paris Olympic 2024)
आणि संध्याकाळचा संधीप्रकाश असताना नॉत्र दॅमच्या छतावर कलाकार नृत्य सादर करतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम बसवणारे थॉमस जॉली यांना पाण्याच्या खालीही काही सादरीकरण करण्याची इच्छा आहे. बंदिस्त स्टेडिअमच्या बाहेर नदीच्या दुतर्फा लाखो लोक एकत्र येणार असल्यामुळे हा कार्यक्रम सुरक्षित पार पाडण्याचं मोठं आव्हान आयोजक आणि शहर प्रशासनावर आहे. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community