-
ऋजुता लुकतुके
ॲथलेटिक्स, जिमनॅस्टिक्स आणि रग्बी सारख्या खेळांच्या अंतिम स्पर्धा सुरू झाल्यावर अमेरिकेनं पदक तालिकेत चीनला मागे टाकायला सुरुवात केली. पहिले १० दिवस आघाडीवर असलेल्या चीनला मागे टाकत अखेर अमेरिकेनं ४० सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. ४० सुवर्ण, ४४ रौप्य आणि ४० कांस्य पदकांसह त्यांनी पदकांचं शतक गाठलं. याउलट चीनने ४० सुवर्ण, २७ रौप्य आणि २३ कांस्य पदक पटकावली. (Paris Olympic 2024)
<
Here’s the final Paris 2024 medal table 🥇🥈🥉
🇮🇳India’s 71st spot in the overall medal tally, which is significantly lower than their 48th overall finish at the 2020 Tokyo Olympics.#ParisOlympics2024 pic.twitter.com/sjIOxynwqp
— Shahil | شاہل | साहिल (@ShahilQuraish) August 12, 2024
यंदा पदक तालिकेत चीनने अमेरिकेला कडवी लढत दिली. २००८ साली ऑलिम्पिक चीनच्या बीजिंग शहरात झालं होतं. तिथे चीनने घरच्या मैदानावर पदकांचं शतक साजरं केलं होतं. त्यानंतर पहिल्यांदा अमेरिकेला पदक तालिकेत चीनकडून असं आव्हान उभं राहिलं. बास्केटबॉल हा अमेरिकेतील एक लोकप्रिय खेळ आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी याच खेळात यजमान फ्रान्सला अटीतटीच्या लढतीत नमवून अमेरिकेनं आपलं ४० वं सुवर्ण जिंकलं. पदक तालिकेत आघाडी घेतली. (Paris Olympic 2024)
सुवर्ण पदकं जेव्हा सारखी असतात तेव्हा रौप्य पदकांच्या संख्येवरून विजेता ठरतो. आणि इथं ४४ रौप्य पदकांसह अमेरिका अव्वल स्थानावर पोहोचलं. अमेरिका आणि चीनचं वर्चस्व होतंच. त्या खालोखाल यजमान फ्रान्सनेही यंदा ६४ पदकांची कमाई केली. (Paris Olympic 2024)
भारतीय पथकाने १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांसह ७१वा क्रमांक पटकावला.
देश |
सुवर्ण |
रौप्य |
कांस्य |
एकूण |
संयुक्त अमेरिका |
४० |
४४ |
४२ |
१२६ |
चीन |
४० |
२७ |
२४ |
९१ |
जपान |
२० |
१२ |
१३ |
४५ |
ऑस्ट्रेलिया |
१८ |
१९ |
१५ |
५३ |
फ्रान्स |
१६ |
२६ |
२२ |
६४ |
भारत (७१ वा) |
० |
१ |
५ |
६ |
हेही पहा-
Join Our WhatsApp Community