-
ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकसाठी (Paris Olympic 2024) पात्र ठरलेल्या खेळाडूंना क्रिकेट स्टार विराट कोहलीने (Virat Kohli) शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्याचवेळी देशबांधवांनाही खेळाडूंच्या मागे उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. २६ जुलैपासून पॅरिस इथं दर चार वर्षांनी रंगणारा ऑलिम्पिक सोहळा सुरू होत आहे. ११३ जणांचा भारतीय चमू यंदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. आणि भारतीय खेळाडू जगात विविध ठिकाणी सराव करत आहेत.
कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हीडिओ हा एका मिनिटाचा आहे. आणि यात त्याने विविध खेळ तसंच खेळाडूंची नावं घेतली आहेत, ज्यात भारताला पदकांची आशा आहे. ‘जागतिक स्पोर्ट्समध्ये भारत एक ताकद म्हणून नावारुपाला येत आहे. आता त्यांच्या बाजूने उभे राहूया,’ असं विराटने (Virat Kohli) या व्हीडिओत म्हटलं आहे.
(हेही वाचा – Bombay High Court साठी बीकेसीमध्ये ४ एकर जमीन देणार; राज्य सरकारची SC ला माहिती)
‘एक काळ असा होता, जेव्हा भारताला सापांचा देश आणि रस्त्यावर हत्ती फिरतात असा देश म्हणून ओळखलं जात होतं. पण, तो देश आता तंत्रज्जान क्षेत्रात प्रगती करत आहे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही बनला आहे. क्रिकेट, बॉलिवूड आणि स्टार्ट अपसाठी ओळखला जात आहे. अशावेळी देशासाठी पुढील मोठी गोष्ट कुठली असणार आहे? मला वाटतं अधिक सुवर्ण, अधिक रौप्य आणि अधिक पदकं. ऑलिम्पिकमध्ये अधिक पदकं मिळवणं हे पुढील उद्दिष्ट असेल.’
From dreams to medals.🏅
It’s time to back our athletes as they step foot into Paris!✊🏼🇮🇳@IIS_Vijayanagar @StayWrogn #JaiHind #WeAreTeamIndia #Paris2024 #RoadToParis2024 #StayWrogn pic.twitter.com/pbi7TYWjsN— Virat Kohli (@imVkohli) July 15, 2024
(हेही वाचा – Accident Mumbai Pune Expressway : वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू)
कोहली पुढे म्हणतो, ‘ऑलिम्पिक नगरीकडे कूच करणारे हे चेहरे लक्षात ठेवा. आणि त्यांना शुभेच्छा द्या. ते भारतासाठी नवीन इतिहास रचणार आहेत. त्यांचा निर्धार मोठा आहे. आणि ते पॅरिसमध्ये तिरंगा फडकवणार आहेत. त्यांच्याबरोबर उभे राहूया. जय हिंद!’
विराट कोहली (Virat Kohli) टी-२० विश्वचषकातील विजयानंतर सध्या आपल्या कुटुंबीयांबरोबर लंडनला आहे. तर पॅरिसला जाणारे खेळाडू जगभरात विविध ठिकाणी सराव करत आहेत. आणि तिथूनच ते थेट पॅरिसला रवाना होतील. यावेळी भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राबरोबरच मुष्टियोद्धा निशांत देवकडूनही पदकाची आशा आहे. तर संघाची एकूण पदक संख्या १० च्या वर जाईल असा विश्वास ऑलिम्पिक असोसिएशनच्या पी टी उषा यांनीही व्यक्त केला आहे. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community