Paris Olympic 2024 : भारोत्तोलन भारताची भिस्त पुन्हा एकदा मीराबाई चानूवर

Paris Olympic 2024 : मीराबाईने टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्याच दिवशी पहिलं पदक जिंकून दिलं होतं.

136
Paris Olympic 2024 : भारोत्तोलन भारताची भिस्त पुन्हा एकदा मीराबाई चानूवर
  • ऋजुता लुकतुके

छोट्या चणीची मीराबाई चानू तुमच्यासमोर आली तर फुंकर घातली तर ती उडून जाईल असं वाटून तुम्ही तिच्याशी जपूनच बोलता. तिची शरीरयष्टी खरोखरच तशी किरकोळ आहे. पण, तिच्या हालचाली आणि आत्मविश्वास पाहिला की, तिचं पाणी समोरच्याला कळून येतं. भाषेच्या अडचणीमुळे ती फार कमी बोलते. पण, कामगिरी चोख करते हे एव्हाना सगळ्यांनाच ठाऊक झालं आहे. पाच फुटांपेक्षा कमी उंची आणि ५० किलोंपेक्षा कमी वजन असलेल्या मीराबाई चानूने तीन वर्षांपूर्वी आपल्या खांद्यांवर १२० किलो वजन तर पेललंच. शिवाय तिच्या पदकामुळे तमाम भारतीयांचा बदललेला मूड तिने खांद्यांवर पेलला आहे. (Paris Olympic 2024)

शिवाय मीराबाईने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रौप्य जिंकण्याची कमाई केली. त्यामुळे टोकयो ऑलिम्पिकला सकारात्मकेनं सुरूवात झाली. ‘७ ऑगस्टला पॅरिस इथं मला पाठिंबा द्या,’ असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स च्या कार्यालयात चित्रित झालेल्या व्हिडिओत बोलताना ती म्हणाली आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – ओबीसींचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणार का? Chandrashekhar Bawankule यांचा सवाल)

सरावासाठी ती वर्षातील बराच काळ पटियाळातच असते. त्यामुळे ही संस्थाच तिला तिचं खरं घर वाटते. ‘मी मणिपूरला असते तेव्हाही या वास्तूची उणीव जाणवते. मला इथली भिंत आठवत राहते,’ असं ती हसत हसत म्हणाली. मीराबाईचं आयुष्य सततच्या चढ उतारांचं राहिलं आहे. त्यात दुखापती आणि फॉर्मचे अनेक अडथळे आहेत. पण, त्याचबरोबर ऑलिम्पिक रौप्य आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील पदकही आहे. (Paris Olympic 2024)

भारोत्तोलन प्रकारात भारताकडून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे सगळ्या आशाही तिच्यावर एकवटल्या आहेत. फक्त प्रश्न आहे तो दुखापतींचा. आताही पाठीच्या दुखापतीतून ती नुकतीच सावरलीय आणि पूर्णवेळ सराव करायला तिने सुरुवात केली ती जानेवारी महिन्यात. त्यानंतर तिचे फीजिओ आणि प्रशिक्षकांनी तिच्यावर चांगली मेहनत घेतली आहे. आता स्पर्धाचं वेळापत्रक आणि तंदुरुस्ती सांभाळत ती पॅरिस ऑलिम्पिक खेळायला सज्ज झाली आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.