Paris Olympic 2024 : ‘या’ रशियन ॲथलीट रशियाकडून न खेळता, इतर देशांकडून का खेळत आहेत?

आणखी १५ ॲथलीटनी त्रयस्थ म्हणून खेळण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

172
Paris Olympic 2024 : ‘या’ रशियन ॲथलीट रशियाकडून न खेळता, इतर देशांकडून का खेळत आहेत?
Paris Olympic 2024 : ‘या’ रशियन ॲथलीट रशियाकडून न खेळता, इतर देशांकडून का खेळत आहेत?
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) असे ३६ खेळाडू आहेत, ज्यांचा जन्म रशियात झालाय, तिथेच ते लहानाचे मोठे झाले आहेत. पण, या ऑलिम्पिकमध्ये ते इतर देशांकडून खेळतायत. तर यातलेच १५ खेळाडू तटस्थ राहून खेळतायत. म्हणजे ते कुठल्याही देशाचं प्रतिनिधित्व करत नाहीत, तर ऑलिम्पिक ध्वजाखाली खेळतात.

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं रशियन ऑलिम्पिक असोसिएशनवर बंदी घातली आहे. त्यामुळे हे खेळाडू रशियाकडून खेळू शकत नाहीत. अशावेळी पॅरिस ऑलिम्पिकसाठी आंतरराष्ट्रीय संघटनेनं ३६ रशियन खेळाडूंना तटस्थ म्हणून खेळण्याचं आमंत्रण दिलं होतं. ते १५ खेळाडूंनी स्वीकारलं. आणि ते आता एआयएन या श्रेणीत खेळत आहेत. म्हणजेच वैयक्तिक तटस्थ खेळाडू म्हणून त्यांना सहभागाची परवानगी असेल. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : नदाल विरुद्ध जोकोविच सामन्यात जोकोविचची सरशी)

ज्या २१ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय संघटनेचं आमंत्रण नाकारलं, ते खेळाडू चक्क इतर देशांकडून खेळत आहेत. २०२२ पासून ६७ खेळाडू इतर देशांकडून खेळत असल्याचं रशियन क्रीडा मंत्रालयानेच गेल्यावर्षी जाहीर केलं होतं. यावर वॉल स्ट्रीट जर्नलने अलीकडेच ही संख्या २०० च्या वर असल्याचा दावा केला होता. हे खेळाडू देश सोडून गेले असल्याचं या अहवालात म्हटलं होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) ४ पूर्वाश्रमीचे रशियन खेळाडू इतर देशांकडून खेळताना दिसत आहेत.

३६ वर्षीय मॅरेथॉनपटू सरडाना ट्रोफीमोवा ही किरगिझस्तानकडून खेळत आहे. २८ वर्षीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू जॉर्जी ओकोरोकोव ऑस्ट्रेलियाकडून खेळतोय. तर २८ वर्षीय जलतरणपटू इगॉर मायलिनही उझबेकिस्तानकडून खेळत आहे. एनास्तेसिया किरपिचनिकोवा ही जलतरणपटू तीनवेळा युरोप स्तरावर चॅम्पियन ठरली आहे. ती आता फ्रान्सकडून खेळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.