Paris Olympic 2024 : १-१ बरोबरीनंतरही रितिका हूडा उपउपांत्य फेरीत का हरली?

Paris Olympic 2024 : रितिकाला आता आसरा आहे तो रेपिचाज फेरीचा 

127
Paris Olympic 2024 : १-१ बरोबरीनंतरही रितिका हूडा उपउपांत्य फेरीत का हरली?
Paris Olympic 2024 : १-१ बरोबरीनंतरही रितिका हूडा उपउपांत्य फेरीत का हरली?
  • ऋजुता लुकतुके

शनिवारी कुस्तीत भारताचं एकमेव आव्हान शिल्लक होतं ते ७६ किलो वजनी गटात रितिका हूडाचं (Ritika Hooda). तिने या गटात उपउपांत्य फेरी गाठली खरी. पण, या लढतीत निकटची प्रतिस्पर्धी ऐपारी मेडेट किझी विरोधात ती १-१ अशा बरोबरीत असूनही तिला पराभूत जाहीर करण्यात आलं. सामना बरोबरीत सुटला असताना बाद फेरीत पुढेचाल मिळवणारा खेळाडू ठरवताना आंतरराष्ट्रीय कुस्ती फेडरेशनचे काही नियम आहेत. त्यामुळे रितिकाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला नाही. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय शेतकऱ्यांवर असा होतोय परिणाम?)

सामन्याच्या निर्धारित ६ मिनिटांत १-१ अशी बरोबरी होती. पण, कुस्तीत अशा बरोबरी नंतर ३ निकषांवर सामन्याचा निकाल ठरतो. हे निकष पुढील प्रमाणे आहेत, (Paris Olympic 2024)

१. प्रतिस्पर्ध्याची जास्तीत जास्त वेळा पकड करणारा खेळाडू जिंकतो 

२. कमीत कमी बचावात्मक पवित्रा घेतलेला खेळाडू जिंकतो 

३. शेवटचा गुण जिंकणारा खेळाडू जिंकतो 

या तीन निकषांपैकी तिसऱ्या निकषावर रितिकाचा पराभव झाला. कारण, सामन्यात पहिल्या दोन मिनिटांत प्रतिस्पर्धी मेडेट किझी जास्त वेळ बचावात्मक असल्यामुळे रितिकाला एक गुण देण्यात आला. सामन्यात शेवटच्या क्षणी किझीला एक गुण मिळाला. तिने बरोबरी साधली. त्यामुळे शेवटच्या गुणाच्या जोरावर तिला पुढेचाल मिळाली आणि ती उपांत्य फेरीत पोहोचली. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Aman Sehrawat : २१ व्या वर्षी पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवणारा अमन सेहरावत कोण आहे?)

पण, या पराभवानंतरही रितिकाला (Ritika Hooda) रेपिचाज फेरीची संधी होती. पण, तिला हरवणारी मेडेट केझी पुढच्याच सामन्यात अमेरिकन केनेडी ब्लेड्सकडून ६-८ अशी पराभूत झाली. त्यामुळे रितिकाचं आव्हानही आता संपुष्टात आलं आहे. अदिती अशोक (Aditi Ashok) आणि दिक्षा डागर (Diksha Dagar) यांचा गोल्फ स्ट्रोकप्ले प्रकारात पराभव झाल्यामुळे आता भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताला एकूण १ रौप्य आणि ५ कांस्य अशी ६ पदकं मिळाली आहेत. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.