- ऋजुता लुकतुके
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या हीटमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेल्या भारतीय महिला व पुरषांच्या ४०० मीटर रिले संघांना ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं आहे. रुपल चौधरी, पूवम्मा, ज्योतिका श्री दांडी आणि शुभा वेंकटेश यांनी ३ मिनिटं, २९.३५ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. हिटमध्ये पहिल्या जमैकाच्या चमूपेक्षा त्यांची वेळ .४० सेकंदांनी जास्त होती. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Ramesh Bais : तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्त्वाची; राज्यपाल रमेश बैस)
महिलांच्या या कामगिरीनंतर काही तासांतच पुरुषांच्या मोहम्मद अनस (Mohammad Anas), मोहम्मद अजमल (Mohammad Ajmal), अरोकिया राजीव (Arokia Rajeev) आणि अनमोल जेकब (Anmol Jacob) या चौकुटानेही ३ मिनिटं आणि ३.२३ सेकंदांत ४०० मीटरचं अंतर कापत हिटमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. (Paris Olympic 2024)
स्पर्धेतील तीन हिटमध्ये पहिले आणि दुसरे आलेले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार होते. अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेऱ्यांमध्ये रविवारी महिला संघ पाचवा आला होता. आणि त्यांची वेळ ३ मिनिटं २९.७४ सेकंदं इतकी होती. त्यात लक्षणीय सुधारणा करत महिलांनी ऑलिम्पिक पात्रता मिळवली आहे. (Paris Olympic 2024)
भारतीय महिला आणि पुरुषांचे रिले संघ 4×400 मीटर पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र
.
.
.#ParisOlympics #relay #Indiamens #Indiafemale #LokSabhaElection2024 #कुत्तो_से_हिरण_बचाओ #PBKSvCSK #अविनाशी_परमात्मा_कबीर #TaskOn #ModiOnceMore2024 #Hindusthanpost #MarathiNews pic.twitter.com/8ioFK8DZ6a— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 6, 2024
तर पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या संघाला बाद व्हावं लागलं होतं. दुसऱ्या टप्प्यात धावणाऱ्या राजेश रमेशला पायात पेटके आल्यामुळे त्याने अर्धवट शर्यत सोडली. आणि त्याचा फटका भारतीय संघाला बसला होता. आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात एकूण १९ भारतीय ॲथलीट खेळणार आहेत. भालाफेकपटू नीरज चोप्रावर भारतीय संघाची मदार असेल. १ ऑगस्टपासून ॲथलेटिक्सच्या स्पर्धा सुरू होत आहेत. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community