Paris Olympic 2024 : धाकड विनेश फोगाट ५० किलो गटात अंतिम फेरीत; भारताचं पदक निश्चित 

Paris Olympic 2024 : अंतिम फेरीत प्रवेश करणारी विनेश पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे 

131
Paris Olympic 2024 : धाकड विनेश फोगाट ५० किलो गटात अंतिम फेरीत; भारताचं पदक निश्चित 
Paris Olympic 2024 : धाकड विनेश फोगाट ५० किलो गटात अंतिम फेरीत; भारताचं पदक निश्चित 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) इतिहास रचला आहे. महिलांमध्ये कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली मल्ल ठरली आहे. ५३ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत तिने क्यूबाच्या युस्नेलिस गुझमानला ५-० ने मात दिली. आता बुधवारी भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साडेबारा वाजता विनेशची सुवर्ण पदकाची लढत होणार आहे. यंदा ऑलिम्पिक गतविजेतीला हरवून विनेशने दणक्यात सुरुवात केली होती. आणि आता अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे.  (Paris Olympic 2024)

विनेश फोगटनं (Vinesh Phogat) सुरुवातीपासून आक्रमकपणे खेळ सुरु केला होता. वाय. गुझमान बचावात्मक खेळ करत होती. त्यामुळं तिला ३० सेकंदांचा वेळ देण्यात आला होता. त्यात देखील ती गुण मिळवू शकली नाही, त्यामुळं विनेश फोगटला पहिला गुण मिळाला.मॅचच्या पूर्वार्धात विनेश फोगट १-० नं आघाडीवर होती.  मॅचच्या दुसऱ्या टप्प्यात क्यूबाच्या वाय. गुझमाननं पलटवार करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यात विनेश फोगटला ३० सेकंदांचा वेळ गुण घेण्यासाठी देण्यात आला. यामध्ये विनेश फोगटनं २ गुण घेत आघाडी ३-० अशी केली.  पुन्हा २ गुण मिळवत विनेशनं आघाडी ५-० अशी केली. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Bangladesh Protests : बांगलादेशमध्ये अस्थिरतेच्या काळात पोलीसच संपावर; केली सुरक्षेची मागणी)

भारताची पैलवान विनेश फोगट (Vinesh Phogat) हिनं दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विनेश फोगट भारताकडून  ५० किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात खेळते. यूक्रेनच्या ओकासाना लिवाच हिचा ७-५ पराभव करत विनेश फोगटनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी विनेश फोगटमध्ये समोर जपानच्या यूई सुसाकीचं आव्हान होतं. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकाही सामन्यात पराभूत न झालेल्या युई सुसाकीला विनेश फोगटनं पराभूत केलं. (Paris Olympic 2024)

यूक्रेनची ओक्साना लिवाच (Oksana Livach) हिचा ७-५ पराभव करत विनेश फोगटनं उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला होता.  विनेश फोगटनं जपानच्या दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणि वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकी चा ३-२ असा पराभव केला. विनेश फोगटनं युई सुसाकीला पराभूत करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा उलटफेर केला आहे.  (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Best Transport : ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ उभारणार मुंबईकरांची लोकचळवळ; महापालिका आणि बेस्टवर केले हे आरोप)

दरम्यान, विनेश फोगट (Vinesh Phogat) यापूर्वी ५३ किलो वजनी गटातून कुस्ती खेळत होती. यावेळी ती  ५० किलो वजनी गटातून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती.  (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.