- ऋजुता लुकतुके
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना विजेतेपदासाठी दिली गेलेली पदकं खराब निघाल्याचं समोर आलं होतं. स्पर्धा संपेपर्यंतच काही जणांची पदकं खराब झाली होती. काहींचा रंग उडाला तर काहींचे टवके उडाले. आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने याची दखल घेऊन आयोजक पदकं बदलून देणार असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे पॅरिसच्या शासकीय नाणेनिधी टांकसाळीत ही पदकं बनली होती. (Paris Olympic Defective Medals)
येत्या काही आठवड्यातच नवीन पदकं बदलून मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास ऑलिम्पिक समितीने व्यक्त केला आहे. फ्रेंच नाणेनिधीच्या प्रवक्त्यानेही पत्रकारांशी बोलताना याविषयी खुलासा केला आहे. ‘या पदकांना आम्ही सदोष म्हणणार नाही. तर ती काहीशी खराब झाली होती, असं आम्ही म्हणू. ऑगस्टपासून काही ॲथलीटनी तशी तक्रार आयोजकांकडे केली आहे आणि तक्रार असलेली पदकं आतापर्यंत आम्ही बदलून दिली आहेत. पुढेही ही प्रक्रिया सुरूच राहील,’ असं त्यांनी म्हटलं आहे. (Paris Olympic Defective Medals)
(हेही वाचा – शहर फेरीवालेमुक्त करण्यात मुंबई महापालिका अपयशी; Bombay High Court चे ताशेरे)
🚨PARIS OLYMPICS 2024 MEDALS FALL APART—LITERALLY!
The Paris 2024 Olympics’ medals are falling apart, with over 100 athletes returning them due to visible damage—particularly bronze medals.
One French swimmer described their medal as looking like it “went through a war.” Is… pic.twitter.com/cbKNELXxgN
— Mario Nawfal (@MarioNawfal) January 13, 2025
फ्रान्समधील एक ऑनलाईन वृत्तपत्र ला लेटर यांनी दिलेल्या बातमीनुसार, आतापर्यंत १०० पदकं खराब झाल्याच्या तक्रारी आयोजकांकडे आल्या आहेत. तर काही खेळाडूंनी सोशल मीडियावर अशा पदकांचे फोटोही शेअर केले आहेत. भारताची दुहेरी पदकविजेती खेळाडू मनू भाकेरने फोटो शेअर केले नसले तरी तिचीही पदकं खराब झाल्याचं म्हटलंय. (Paris Olympic Defective Medals)
ला लेटरने यावर सविस्तर बातमी केली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, फ्रान्समधील बदलेल्या नियमांमुळे हे घडलं आहे. एका प्रकारचं वॉर्निश वापरायला अचानक बंदी घालण्यात आली. त्यामुळे त्यांचं फिनिशिंग चांगलं झालं नाही. लुई व्हितॉ या जगप्रसिद्ध फ्रेंच फॅशन कंपनीची एक उपकंपनी शाऊमेनं ही पदकं बनवली आहेत. त्याचं डिझाईनही त्यांचंच आहे. (Paris Olympic Defective Medals)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community