Paris Olympic Qualification : नेमबाज अर्जुन आणि तिलोत्तमा यांची ऑलिम्पिक वारी निश्चित

आशियाई विजेतेपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात मिळालेल्या रौप्य पदकांमुळे अर्जुन बबुता आणि तिलोत्तमा सेन यांचा ऑलिम्पिक कोटा निश्चित झाला आहे

173
Paris Olympic Qualification : नेमबाज अर्जुन आणि तिलोत्तमा यांची ऑलिम्पिक वारी निश्चित
Paris Olympic Qualification : नेमबाज अर्जुन आणि तिलोत्तमा यांची ऑलिम्पिक वारी निश्चित
  • ऋजुता लुकतुके

आशियाई विजेतेपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात मिळालेल्या रौप्य पदकांमुळे अर्जुन बबुता आणि तिलोत्तमा सेन यांचा ऑलिम्पिक कोटा निश्चित झाला आहे. दक्षिण कोरियात चँगवॉन इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत रायफल नेमबाज अर्जुन बबुता आणि तिलोत्तमा सेन यांनी ऑलिम्पिक पात्रतेचा निकष पूर्ण करत कोटा मिळवला आहे. दोघांनी अनुक्रमे पुरुषांच्या आणि महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. (Paris Olympic Qualification)

अर्जुनने पुरुषांच्या सांघिक स्पर्धेतही संघाच्या सुवर्ण विजयात हातभार लावला. दिव्यांश पनवर आणि ह्रिदय हजारिका यांच्यासह त्याने सांघिक सुवर्णही आपल्या नावावर केलं आहे. आशियाई विजेतेपद स्पर्धेतून ऑलिम्पिक कोटा मिळवणारा तो नववा भारतीय नेमबाज ठरला आहे. ‘यापूर्वी इतका आनंद मला कधीच झाला नव्हता. हे माझं एकट्याचं यश नाही. मी, माझे प्रशिक्षक पियर थॉमस सर तसंच राष्ट्रीय प्रशिक्षक सुमा शिरुर अशा सगळ्यांनी मिळून त्यासाठी धोरणात्मक प्रयत्न केले आहेत. आम्ही जसं नियोजन केलं होतं, तसंच सगळं घडलं हे आमचं नशीब. आता खेळातील इतरही त्रुटींवर लक्ष देणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया अर्जुनने सामन्यानंतर दिली. (Paris Olympic Qualification)

(हेही वाचा – Sharad Pawar on Maratha Reservation : सरकार बघ्याची भूमिका घेते का ?; शरद पवार यांचा मराठा आरक्षणप्रकरणी थेट प्रश्न)

अर्जुनच्या रौप्य कमाईनंतर काही तासातच तिलोत्तमा सेनने महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्य जिंकलं. १५ वर्षीय तिलोत्तमाने अंतिम फेरीत २५२.३ गुण मिळवले. तिलोत्तमाचं सुवर्ण अगदीच थोडक्यात हुकलं. कारण सुवर्ण विजेत्या कोरियाच्या केवॉन युंजीला २५२.४ गुण मिळाले आहेत. भारताच्याच रमिता जिंदालने कांस्य पदक जिंकलं. तिलोत्तमा पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर होती. पण, अंतिम स्पर्धेत तिने आपला खेळ उंचावला. शेवटच्या टप्प्यापर्यंत तिने सुवर्ण विजेत्या युंजीला लढत दिली. पण, काही तांत्रिक गडबडींमुळे तिचं सुवर्ण हुकलं. (Paris Olympic Qualification)

या स्पर्धेत भारताने एकूण ७ ऑलिम्पिक कोटा जिंकले आहेत. यातले ५ रायफल प्रकारात तर २ शॉटगन आणि १ पिस्तुल प्रकारातील आहे. एका क्रीडाप्रकारात एका देशाला दोन कोटा मिळू शकतात. म्हणजे एका प्रकारात प्रत्येक देशाचे जास्तीत जास्त दोन खेळाडू खेळू शकतात. अर्जुन बरोबरच दिव्यांश पनवर या अव्वल भारतीय नेमबाजानेही १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. पण, त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. (Paris Olympic Qualification)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.