Paris Olympic 2024 : मुष्टीयुद्धात निखत आणि लवलिनचा आधार

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ६ मुष्टियोद्धे सहभागी होणार आहेत.

149
No Boxing in Olympics : लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून मुष्टियुद्ध हद्दपार?
  • ऋजुता लुकतुके

कुस्ती प्रमाणेच मुष्टियुद्धातही भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्तरावर पदकविजेती कामगिरी केली आहे. हरियाणातील भिवानी बॉक्सिंग क्लब आणि मणिपूर, ईशान्य भारतातील खेळाडू हे मुष्टियुद्धातील खाण आहेत. २००८ मध्ये विजेंदर कुमारने पहिलं रौप्य पदक पटकावलं आणि त्यानंतर २०१२ मध्ये मेरी कोम तर २०२० मध्ये लवलिन बोरहोहेनने पदकांची परंपरा कायम ठेवली आहे. रिओमध्ये फक्त यात खंड पडला. (Paris Olympic 2024)

यावेळीही ६ मुष्टीयोद्धे जर्मनीत ऑलिम्पिकची तयारी करत आहेत आणि लवकरच पॅरिससाठी रवाना होणार आहेत. यावेळी पहिल्यांदा महिला खेळाडूंची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.पदकांची अपेक्षाही निखत झरिन आणि लवलिना बोरगोहेनकडून आहे. (Paris Olympic 2024)

निखत झरिन – मागची काही वर्ष निखत झरिन या वजनी गटात वर्चस्व मिळवण्यासाठी झगडतेय. तिची स्पर्धा मेरी कोमशी असल्यामुळे तिला भारतीय संघात येण्यासाठी वेळ लागला. यावेळी मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेतच तिने ऑलिम्पिक पात्रता गाठली. त्यामुळे तिचे हौसलेही बुलंद आहेत. आणि सरावासाठी तिला वेळही मिळालाय. अनेक वर्षं तिने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी लढा दिला आहे. आता वेळ आली आहे ऑलिम्पिक आपल्या नावावर करण्याची. आणि तोच तिचा प्रयत्न असणार आहे. (Paris Olympic 2024)

लवलिना बोरगोहेन – लवलिनाने टोकयोमध्ये पदक जिंकत स्वत:ला सिद्ध केलं आहेच. यावेळी ती ७५ किलो गटात खेळणार आहे. आणि या गटात आल्यावर तिने चांगली प्रगती केली आहे. विश्वविजेतेपद तिच्या नावावर आहे. आशियाई खेळांमध्ये तिने रौप्य जिंकलंय. तर झेक रिपब्लिकमध्ये तिने कांस्य जिंकलं आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Bangladesh मध्ये आरक्षण ५६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर; हिंसाचाराची धग मात्र कायम)

प्रीती पवार – आक्रमक डावखुरी मुष्टियोद्धा प्रीती पवार खेळातील नजाकतीसाठीही ओळखली जाते. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिने रौप्य जिंकलंय. मॅटवर कठोर मेहनत करणारी आणि नियोजनबद्ध खेळ करणारी प्रीती २२ वर्षांखालील गटात पहिली आली तेव्हापासून नाव कमावून आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताची पदकाची दावेदार म्हणून तिचं नाव घेतलं जात आहे. (Paris Olympic 2024)

जस्मिन – जस्मिनला राष्ट्रकूल क्रीडास्पर्धेत कांस्य मिळवलं. पण, आशियाई क्रीडास्पर्धा आणि ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तिचा दणकून पराभव झाला. त्यानंतर तिने आपला वजनी गट बदलून ५७ किलो केला. आणि तेव्हापासून तिचं बुडतं जहाज पुन्हा एकदा किनाऱ्यावर आलं आहे. परवीनमुळे गेलेला ऑलिम्पिक कोटा तिने परत मिळवला. (Paris Olympic 2024)

अमित पनघल – पुरुषांच्या गटात यावेळी भलतीच गडबड झाली. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि पहिली ऑलिम्पिक पात्रता यात एकही मुष्टीयोद्धा पात्र ठरला नाही. मध्ये आणखी काही महिने गेले. शेवटच्या टप्प्यात अमित पनघल ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. त्यासाठी त्याच्याकडे एकमेव संधी उरली होती ती स्ट्रँडा स्मृती स्पर्धेची आणि तिथे त्याने पात्रता मिळवली. पण, ऑलिम्पिकमधील त्याचं आव्हान सोपं असणार नाही. (Paris Olympic 2024)

निशात देव – अमितच्या तुलनेत निशांत देवने वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत क्युबाच्या मुष्टियोद्ध्याला हरवत त्याने आपलं कसब सिद्ध केलं आहे. आता त्याच्याकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.