- ऋजुता लुकतुके
भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि पी.व्ही. सिंधू (P.V. Indus) यांच्या परदेशात सराव करण्याच्या प्रस्तावाला क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या दोघांचा परदेशातील प्रवासाचा खर्च तसंच सरावाचा खर्च हा केंद्रसरकारकडून केला जाणार आहे. (Paris Olympics 2024)
(हेही वाचा- Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा!)
आय अंतर्गत, लक्ष्य सेन (Lakshya Sen) ८ जुलै ते २१ जुलै दरम्यान फ्रान्सच्या मार्सेलिस इथं सराव करणार आहे. त्याचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ या सगळ्यांचा खर्च क्रीडा मंत्रालय करणार आहे. तर सिंधू (P.V. Indus) ऑलिम्पिकपूर्वी (Paris Olympics 2024) सलग एक महिला जर्मनीत सराव करणार आहे. या प्रशिक्षणाचा खर्चही क्रीडा मंत्रालय करणार आहे. ‘सिंधू आणि लक्ष्य या बॅडमिंटनपटूंचा विमान प्रवासाचा खर्च, तिथल्या राहण्या-जेवणाचा खर्च, स्थानिक प्रवासाचा खर्च तसंच व्हिसा खर्चही मिशन ऑलिम्पिक पोडिअम मार्फत करण्यात येईल,’ असं क्रीडा मंत्रालायने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. (Paris Olympics 2024)
खेळाडूंच्या विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी मिशन ऑलिम्पिक सेलची बैठक गुरुवारी नवी दिल्लीत झाली. आणि यात टेबलटेनिसपटू श्रीजा अकुला (Srija Akula) आणि तिरंदाज त्रिशा (Archer Trisha) पुनियाला खेळाशी संबंधित साधनं आणि उपकरणं घेण्यासाठी आर्थिक निधी देण्यात येणार आहे. तसंच गोल्फपटू अदिती अशोक आणि जलतरणपटू आर्यन नेहराला (Aryan Nehra) ऑलिम्पिकपूर्वी स्पर्धा खेळण्यासाठीही पैसे दिले जाणार आहेत. (Paris Olympics 2024)
(हेही वाचा- Pune Porsche Car Accident: ‘बाळा’च्या आजोबांना अटक! ड्रायव्हरला धमकी देणे पडले महागात)
आणखी एक टेबलटेनिसपटू हरमित देसाई (Harmit Desai) आणि महिलांचा ४०० मीटर रिले चमू आता अधिकृतपणे टॉप्स योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. तसंच कुस्तीपटू निशा आणि रितिकाचाही टॉप्सच्या मुख्य गटात समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही कुस्तीपटूंनी ऑलिम्पिक पात्रता मिळवली आहे. तर नवोदित गोल्फपटू कार्तिक सिंगलाही २०३२ आणि २०२८ चं ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. (Paris Olympics 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community