-
ऋजुता लुकतुके
पॅरिस पॅरालिम्पिक खेळात (Paris Paralympic Games 2024) ज्युदोच्या ६० किलो वजनी गटात जे१ प्रकारात भारताने पॅरालिम्पिकमधील आपलं पहिलं पदक जिंकलं ते कपिल परमारच्या (Kapil Parmar) कामगिरीमुळे. त्याने कांस्य पदकाच्या लढतीत ब्राझीलचा प्रतिस्पर्धी एलिलटन दी ओलिव्हेराचा (Elielton de Oliveira) १०-० असा दणदणीत पराभव केला. उपान्त्य सामन्यात इराणच्या आबदीकडून कपिलचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर पुढील लढतीसाठी त्याला फारसा वेळही मिळाला नाही. पण, तरीही पदकाच्या सामन्यात कपिल परमारने (Kapil Parmar) सुरुवातच दणक्यात केली. आणि भारताला ज्युदोमधील पहिलं पॅरालिम्पिक म्हणूनच ऐतिहासिक पदक जिंकून दिलं. जे १ प्रकारात खेळणारे खेळाडू हे डोळ्यांनी अंशत: किंवा पूर्णपणे अंध असतात. त्यांच्या गणवेशावर लाल गोल काढलेला असतो. अशा खेळाडूंना हालचालींसाठी इतरांची मदत लागू शकते असं हा गोल सुचवतो. (Paris Paralympic Games 2024)
कपिल परमारने (Kapil Parmar) उपउपान्त्य फेरीत व्हेनेझुएलाच्या मार्को डेनिस ब्लँकोचाही १०-० असा पराभव केला होता. त्याचा झपाटा पाहून उपान्त्य लढतीतही त्याच्याकडून आशा होत्या. पण, नेमकी तिथे त्याची गाडी अडखळली. पण, कांस्य जिंकून त्याने कसर भरून काढली.
(हेही वाचा – Western Railway : विरारकरांची गर्दीपासून होणार सुटका; बोरिवली ते विरार पाचव्या अन् सहाव्या मार्गिकेतील अडसर दूर)
#ParaJudo🥋: Men’s J1 – 60 Kg #Bronze Medal🥉 Match #ParisParalympics2024🇫🇷 debutant Kapil Parmar clinches a historic #Bronze🥉, beating Brazil’s🇧🇷 Elielton de Oliveira 10-0 via an Ippon.
It is also a first-ever medal🏅 for India🇮🇳 in #ParaJudo in the history of… pic.twitter.com/25xhp8eM7K
— SAI Media (@Media_SAI) September 5, 2024
(हेही वाचा – Duleep Trophy 2024 : मुशीर खानच्या शतकाखेरिज पहिला दिवस गोलंदाजांचाच)
२०२२ च्या आशियाई क्रीडास्पर्धेत रौप्य जिंकून कपिल परमार (Kapil Parmar) प्रकाशझोतात आला होता. कपिल मध्यप्रदेशच्या शिवोर गावातून येतो. लहानपणी अंगणात खेळत असताना वीजेचा धक्का बसून त्याला अपघात झाला. तो तब्बल ६ महिने कोमात होता. अपघातातून तो सावरला तो त्याची दृष्टी ८० टक्क्यांच्या वर गेली. पण, जिद्द न हरता तो शिक्षणाबरोबरच इतर गोष्टींमध्येही पुढे पुढे जात राहिला. (Paris Paralympic Games 2024)
मधला भाऊ ज्युदोत पटाईत होता. त्याच्याबरोबर कपिल ज्युदो खेळायला लागला. आणि त्यातच तो रमायला लागला. आक्रमक खेळासाठी तो प्रसिद्ध आहे. आताही कांस्य पटकावलं असलं तरी दोनदा त्याला येलो कार्ड मिळालं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community