Paris Paralympic Games : प्रीती पालला दुसरं पदक तर निशाद कुमारचं सलग दुसऱ्या स्पर्धेत रौप्य 

Paris Paralympic Games : पॅरालिम्पिक खेळात भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट सुरूच ठेवली आहे 

132
Paris Paralympic Games : प्रीती पालला दुसरं पदक तर निशाद कुमारचं सलग दुसऱ्या स्पर्धेत रौप्य 
Paris Paralympic Games : प्रीती पालला दुसरं पदक तर निशाद कुमारचं सलग दुसऱ्या स्पर्धेत रौप्य 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस पॅऱालिम्पिक खेळांमध्ये भारताची सुरुवात चांगलीच झाली आहे. रविवारी दोन पदकांची भर भारतीय खात्यात पडली. प्रीती पाल (Preeti Pal) या ट्रॅक अँड फिल्ड खेळाडूने या पॅरालिम्पिक स्पर्धेतील सलग दुसरं पदक जिंकलं. तर निशाद कुमारने (Nishad Kumar) उंच ऊडीत सलग दुसरं रौप्य पटकावलं. प्रीती पाल एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. त्यातच तिने मिळवलेलं यश हे ट्रॅक अँड फिल्डमधील आहे. या प्रकारात आतापर्यंत भारतीय खेळाडूंना पदकांनी हुलकावणीच दिली होती. २३ वर्षीय प्रीतीने १०० मीटर पाठोपाठ २०० मीटरमध्येही टी३५ प्रकारात दुसरं कांस्य जिंकलं. वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवताना प्रीतीने रविवारी रात्री २०० मीटरमध्ये ३०.०१ सेकंदांची वेळ नोंदवली.  (Paris Paralympic Games)

(हेही वाचा- Environment  free Mumbai : चिकन तंदुरी शिग कबाब होणार बंद, मुंबई महापालिकेने उचलले हे पाऊस)

तर निशादने उंच ऊडीत टी४७ प्रकारात २.०४ मीटरचं अंतर सर केलं. रौप्य पदक जिंकलं. गेल्या खेपेला टोकयोमध्येही निशादने रौप्य जिंकलं होतं. (Paris Paralympic Games)

 ट्रॅक अँड फिल्ड प्रकारातही प्रीती पालने (Preeti Pal) भारताला पहिली पदकं मिळवून दिली आहेत. या प्रकारात सलग दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी टोकयो ऑलिम्पिकमध्ये अवनी लेखराने सुवर्ण आणि कांस्य जिंकलं होतं. पण, प्रीतीने ॲथलेटिक्समध्ये देशासाठी पहिली पॅरालिम्पिक पदक जिंकलं आहे. रविवारच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रीतीचं कौतुक केलं आहे.  (Paris Paralympic Games)

 दुसरीकडे, टी४७ प्रकारात उंच ऊडीमध्ये निशादला आव्हान होतं ते अमेरिकेच्या रॉडरिग्जचं. तो सध्याचा या प्रकारातील विश्वविजेता आणि विक्रमवीरही आहे. त्याला मागे टाकणं निशादसाठी कठीणच होतं. रॉडरिग्जने पहिल्याच प्रयत्नात २.१२ मीटरची ऊडी मारली. निशादसाठी चुरस निर्माण केली. निशादने २.०२ मीटरची मजल मारली. पण, रॉडरिग्जला मागे टाकणं त्याला जमलं नाही. निशादचं हे दुसरं पॅरालिम्पिक पदक आहे.  (Paris Paralympic Games)

 निशाद कुमार हा झुंजार खेळाडू म्हणून ओळखला जातो. सहाव्या वर्षी गवत कापण्याच्या यंत्रात अडकून त्याने आपला हात गमावला. पण, व्हॉलीबॉल खेळाडू असलेल्या आईच्या पाठिंब्याने त्याने खेळांमधील आपला प्रवास सुरूच ठेवला. २५ व्या वर्षी तो दोन पदकांचा मालक आहे. तो सुरुवातीला कुस्ती आणि धावण्याच्या शर्यतीत पुढे होता. पण, २०१७ मध्ये त्याला पहिल्यांदा व्यावसायिक प्रशिक्षण मिळालं. तेव्हा तो भालाफेक करत होता. पण, प्रशिक्षकांनी त्याला उंच ऊडीकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आधी आशियाई स्तरावर सुवर्ण आणि मागोमाग टोकयोतही त्याने पॅरालिम्पिक खेळात रौप्य जिंकलं.  (Paris Paralympic Games)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.