Paris Paralympic Games : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला पदक विजेत्यांशी संवाद

Paris Paralympic Games : रविवारी व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून पंतप्रधानांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं 

77
Paris Paralympic Games : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला पदक विजेत्यांशी संवाद
Paris Paralympic Games : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला पदक विजेत्यांशी संवाद
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पदक विजेत्या खेळाडूंशी फोन किंवा व्हीडिओ कॉल द्वारे बोलण्याचा पायंडा पाडला होता. आता पॅरालिम्पिकमध्येही त्यांनी तो कायम राखला आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी रविवारी पंतप्रधान मोदींनी पॅरिसमध्ये व्हीडओ कॉल करून मोना अगरवाल (mona aggarwal), मनिष नरवाल (Manish Narwal), प्रीती पाल (Preeti Pal) आणि रुबिना फ्रान्सिस यांचं अभिनंदन केलं. अवनी लेखराचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पण, तिचा सोमवारी लवकर सामना असल्यामुळे ती या कॉलमध्ये सहभागी झाली नव्हती.  (Paris Paralympic Games)

(हेही वाचा- Yavatmal Hindus : हिंदूंनी बहिष्‍काराची धमकी देताच मुसलमान नरमले; यवतमाळ येथील घटना)

‘तुमच्या कामगिरीने तुम्ही कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा देशवासीयांना दिली आहे. तुमच्यामुळे आमची छाची अभिमानाने भरून आली आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे. १४० कोटी देशवासीय तुमच्या पाठीशी आहेत,’ असं मोदी या पॅराॲथलीटना म्हणाले. (Paris Paralympic Games)

 पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) पॅरिसमधील सुविधांबद्दलही खेळाडूंकडे चौकशी केली. अवनीला सोमवारच्या तिच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. या पॅरालिम्पिक खेळांत भारताने आतापर्यंत ५ पदकं जिंकली आहेत. यात अवनी लेखराने १० मीटर एअर रायफल एसएच३ प्रकारात सुवर्ण जिंकलं आहे. त्याच प्रकारात मोना अगरवालने कांस्य पटकावलं आहे. तर मनिष नरवालने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात एसएच१ प्रकारात रौप्य जिंकलं आहे. महिलांमध्ये याच प्रकारात रुबिना फ्रान्सिसने कांस्य नावावर केलं आहे. तर प्रीती पाल ट्रॅक अँड फिल्डमध्ये कांस्य जिंकणारी पहिली भारतीय पॅराॲथलीट ठरली आहे. बॅडमिंटनच्या एसएल३ प्रकारात नितेश कुमार अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे त्यानेही किमान रौप्य निश्चित केलं आहे. भारतीय पथक यंदा सुवर्ण पदकांचा दुहेरी आकडा गाठण्यासाठी उत्सुक आहे. (Paris Paralympic Games)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.