Paris Paralympic : ॲथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची लूट, टोकयो पॅरालिम्पिक खेळांचा आकडा टाकला मागे 

Paris Paralympic : भारतीय पथकाने आतापर्यंत ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य जिंकली आहेत 

82
Paris Paralympic : ॲथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची लूट, टोकयो पॅरालिम्पिक खेळांचा आकडा टाकला मागे 
Paris Paralympic : ॲथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची लूट, टोकयो पॅरालिम्पिक खेळांचा आकडा टाकला मागे 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस पॅरालिम्पिक (Paris Paralympic) खेळांच्या सहाव्या दिवशीच भारतीय पथकाने टोकयो खेळांमधील पदकांचा आकडा पार केला आहे. ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य पदकांसह भारतीय पथकाने एकूण २० पदकं आपल्या नावावर केली आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे ॲथलेटिक्स आणि ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात भारतीय पॅराॲथलीटनी मिळवलेलं यश सुखावणारं आहे. एरवी या प्रकारात ऑलिम्पिकमध्येही आपल्याला पदकांनी नेहमीच हुलकावणी दिली आहे.

(हेही वाचा- PUNE : मध्य रेल्वेकडून लोहमार्गांचे दुहेरीकरण सुरू; नव्या ट्रेन्सची अपेक्षा)

सहाव्या दिवशीच भारताच्या खात्यात आणखी ५ पदकं जमा झाली. ही सगळी ट्रॅक अँड फिल्डमधील होती. २० पदकांसह आता भारतीय पथक पदकांच्या क्रमवारीत सतराव्या स्थानावर आहे. मंगळवारी रात्री एफ ४६ भालाफेक प्रकारात भारताच्या अजित सिंग (Ajeet Singh) आणि सुंदर सिंग गुर्जर (Sundar Singh Gurjar) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य जिंकलं. एफ ४६ प्रकार हा एक किंवा दोन्ही हात अंशत: नसलेल्या खेळाडूंसाठी आहे. किंवा एखादा हात पूर्णपणे नसेल तरी तो खेळाडू या प्रकारात बसतो. (Paris Paralympic)

 अजित सिंगने ६५.६२ मीटरवर भालाफेक केली. तर सुंदरने ६४.९६ या प्रकारात विश्वविक्रम सुंदरच्या नावावर आहे. पण,यावेळी तो आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही. तर उंच उडी प्रकारातही भारताचे दोन खेळाडू पोडिअमवर होते. शरद कुमार आणि मरियप्पम थंगवेलू यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य जिंकलं. थंगवेलू या प्रकारातील टोकयो सुवर्ण पदक विजेता आहे. पण, यावेळी त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. टी६३ प्रकारात शरद कुमारची उडी १.८८ मीटरवर तर थंगवेलाची उडी १.८५ मीटरवर पोहोचली.  (Paris Paralympic)

 तर दीप्ती जीवनजीने (Deepthi Jeevanji) ४० मीटर शर्यतीत टी२० प्रकारात आणखी एक कांस्य मिळवलं. हे अंतर तिने ५५.८२ सेकंदांत पूर्ण केलं. बुद्धीने दिव्यांग असलेल्या दीप्तीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अभिनंदन केलं आहे. या प्रकारात युक्रेनच्या युलिया शुलरला सुवर्ण तर टर्कीच्या ऑयझर आँडरला कांस्य मिळालं. (Paris Paralympic)

दीप्तीही तेलंगाणाच्या वारंगल जिल्ह्यातील केलडा गावची आहे. लहानपणी शाळेत तिच्या शिक्षिकेला तिच्यातील व्यंग आढळलं. त्यानंतर आजूबाजूचे मित्र-मैत्रिणी आणि गावकरी चेष्टा करत असताना दीप्तीने मात्र अवहेलना सहन करत धावण्याचा सराव सुरू ठेवला. आशियाई पॅराखेळांमध्ये सुवर्ण आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेत विश्वविक्रमासह अव्वल स्थान ही तिची आतापर्यंतची कमाई आहे. २० वर्षीय दीप्तीचं हे पहिलं पॅरालि्म्पिक होतं.  (Paris Paralympic)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.