Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिक खेळांचा रंगारंग उद्घाटन सोहळा; भाग्यश्री, सुमित भारताचे पथक प्रमुख 

Paris Paralympics 2024 : भव्य उद्घाटन सोहळ्याने पॅरिस पॅरालिम्पिक खेळांना सुरुवात झाली आहे 

131
Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिक खेळांचा रंगारंग उद्घाटन सोहळा; भाग्यश्री, सुमित भारताचे पथक प्रमुख 
Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिक खेळांचा रंगारंग उद्घाटन सोहळा; भाग्यश्री, सुमित भारताचे पथक प्रमुख 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकच्या पाठोपाठ पॅरालिम्पिक खेळांना गुरुवारी पहाटे रंगारंग उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. भालाफेकपटू सुमित अंतिल आणि शॉटपुट खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी ८४ खेळाडूंच्या भारतीय पथकाचं नेतृत्व केलं. यंदा भारताचं आतापर्यंतच सगळ्यात मोठं पॅराॲथलीटचं पथक या स्पर्धेत सहभागी झालं आहे. एकूण १२ क्रीडा प्रकारात हे खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत. टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीत दुहेरी यश मिळालं होतं. नीरजने ऑलिम्पिकमध्ये जे यश मिळवलं, त्याचीच पुनरावृत्ती सुमितने पॅरालिम्पिकमध्य केली. गुरुवारी सुमितच भारताचा ध्वजवाहक होता. (Paris Paralympics 2024)

तर होआंगझाओ इथं आशियाई खेळांमध्ये शॉटपुट प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून देणारी भाग्यश्री जाधवही (Bhagyashree Jadhav) सुमितच्या साथीनं पथकाचं नेतृत्व करत होती. शॉटपुटमध्ये भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेलं हे पहिलं पदक असल्यामुळे भाग्यश्रीच्या कामगिरीला वेगळं महत्त्व होतं. आता पॅरालिम्पिकमध्ये तिच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष असेल. (Paris Paralympics 2024)

पॅरालिम्पिक खेळांचा उद्घाटन सोहळाही ऑलिम्पिकप्रमाणेच दिमाखदार होता. दृढनिश्चय आणि समता हा पॅरालिम्पिक खेळांचा स्थायीभाव आहे. त्याभोवतीच उद्गाटन सोहळ्याची आखणी केलेली होती. (Paris Paralympics 2024)

भारतीय पथकाचे सामने पहिल्या दिवशीपासूनच सुरू होत आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पॅराॲथलीटना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. १४० कोटी लोकांचा पाठिंबा तुम्हाला आहे. तुम्ही जिंकून या, असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारताच्या ८४ जणांच्या पथकात एकूण ३२ महिला पॅराॲथलीट आहेत. आणि यंदा भारतीय पथक सायकलिंग, अंधांसाठी तायक्वांडो आणि पॅरा रोईंग या तीन नवीन प्रकारात सहभागी होणार आहे. अवनी लेखरा, मानसी जोशी यांच्याकडून भारताला पदकाच्या अपेक्षा असतील. (Paris Paralympics 2024)

‘भारताच्या पॅराॲथलीटना पॅरालिम्पिक खेळांसाठी १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा. पॅराॲथलीटचा दृढ निश्चय आणि धैर्य इतर भारतीयांसाठीही नेहमी प्रेरणादायी ठरेल. चिअर फॉर इंडिया. तुमच्या यशासाठी आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहोत,’ या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्या दिवशी पॅरा बॅडमिंटन, पॅरा सायकलिंग आणि पॅरा तिरंदाजी या तीन प्रकारातील सामने होणार आहेत. (Paris Paralympics 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.