Paris Paralympics 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पॅरालिम्पिक विजेत्यांशी भेट

Paris Paralympics 2024 : पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक खेळांमधील पदक विजेत्यांना आपल्या घरी आमंत्रण दिलं. 

170
Paris Paralympics 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पॅरालिम्पिक विजेत्यांशी भेट
  • ऋजुता लुकतुके

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी पॅरालिम्पिक खेळांतील पदक विजेत्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांचं अभिनंदन केलं. त्यांच्याशी संवादही साधला. यंदा पॅरालिम्पिक खेळांत भारतीय पथकाने विक्रमी २९ पदकांची कमाई केली. यात ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाने नंतर जारी केलेल्या व्हिडिओत पंतप्रधान पदक विजेत्या खेळाडूंबरोबर गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी क्रीडामंत्री मनसुख मांडवीय आणि पॅरालिम्पिक संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र झांजरिया उपस्थित होते. (Paris Paralympics 2024)

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांच्यासाठी काहीही ! …म्हणून मिळाले शिवसेनेला संसदेत कार्यालय)

नेमबाजीत या स्पर्धेतील पहिलं सुवर्ण जिंकणारी अवनी लेखरा आणि ज्युदो खेळात पहिलं वहिलं पॅरालिम्पिक पदक जिंकून देणारा कपिल परमार यांनी यावेळी पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा केली. तर कपिल परमारने आपल्या पदकावर मोदींची स्वाक्षरीही घेतली. यापूर्वी टोकयो पॅरालिम्पिक खेळांत भारतीय पथकाने १९ पदकं जिंकली होती. यात ५ सुवर्णांचा समावेश होता. यावेळी ही पदक संख्या भारताने मागे टाकली. (Paris Paralympics 2024)

(हेही वाचा – ICC Test Championship : अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित १० पैकी ‘इतक्या’ कसोटी जिंकाव्याच लागतील)

८४ जणांच्या भारतीय चमूने यंदा अनेक गोष्टी साध्य केल्या. ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताने पहिल्यांदाच पदकं मिळवली. तर तिरंदाजीतही हरविंदर सिंगने ऐतिहासिक सुवर्ण मिळवलं. मायदेशात परतल्यावर पॅराॲथलीटचंही सरकारकडून कौतुक करण्यात आलं आहे. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी ७५ लाख रुपये, रौप्य विजेत्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये तर कांस्य विजेत्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये देऊन गौरवण्यात आलं. (Paris Paralympics 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.