-
ऋजुता लुकतुके
भारताच्या अवनी लेखराने (Avani Lekhara) १० मीटर एअर रायफल प्रकारात नवीन पॅरालिम्पिक खेळांमधील विक्रम रचत सुवर्ण नावावर केलं. त्यामुळे पॅरालिम्पिक खेळात सलग दोन सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. एसएच १ प्रकारात अवनीची साथीदार मोना अगरवालने कांस्य नावावर केलं. अंतिम फेरी चुरशीची झाली. आणि २४९.७ गुण कमावत अवनीने आपलाच टोकयो ऑलिम्पिकमधील विक्रम मोडला. टोकयोमध्ये अवनीनेच २४९.६ गुण कमावले होते. पॅरालिम्पिक खेळातील यंदाचं भारताचं हे पहिलं सुवर्ण ठरलं आहे. (Paris Paralympics)
GOLD 🥇 For INDIA 🇮🇳
Avani Lekhara wins gold medal in the Women’s 10m air Rifle SH1 event with a score of 249.7 🙌#Paris2024 #Cheer4Bharat #Paralympics2024 @mansukhmandviya @MIB_India @PIB_India @IndiaSports @ParalympicIndia @PCI_IN_Official @Media_SAI @AkashvaniAIR… pic.twitter.com/mcFf6gxQ1t
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 30, 2024
(हेही वाचा – शरद पवारांना धक्का ? बडा नेता BJP प्रवेशाच्या तयारीत, विनोद तावडेंशी बंद दाराआड चर्चा)
अवनी अकरा वर्षांची असताना कार अपघातात तिच्या पायाची नस दबली गेली. आणि तिचं शरीर कमरेपासून लुळं झालं. तेव्हापासून ती व्हीलचेअरला खिळलेली आहे. पण, अभ्यासात आणि खेळातही हुशार आहे. तर तिची साथीदार मोना अगरवालने तर २०२२ मध्ये एसएच १ प्रकारातील नेमबाजी शिकायला सुरुवात केली. आणि आता दोनच वर्षांत पॅरालिम्पिक कांस्य पदकापर्यंत तिने मजल मारली आहे. तिला अंतिम फेरीत २२८.७ गुण मिळाले. अवनी आणि दुसरा क्रमांक पटकावणारी दक्षिण कोरियाची युरी ली यांच्यात तब्बल २.९ गुणांची तफावत आहे. यातूनच अवनीची हुकुमत लक्षात येते. (Paris Paralympics)
अवनीबरोबरच पायाने तिरंदाजी करणारी शीतल देवीही तिरंदाजीत चमकली आहे. तिने गुरुवारी १३९९ गुणांसह विश्वविक्रम करून क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यामुळे तिला एकेरीत चांगला ड्रॉ मिळाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community