Paris Paralympics : ‘इतक्या’ पदकांसह भारताच्या सर्वाधिक यशस्वी पॅऱलिम्पिक खेळांची सांगता

यंदाच्या पॅरालिम्पिक खेळांत भारताची कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे.

142
Paris Paralympics : ‘इतक्या’ पदकांसह भारताच्या सर्वाधिक यशस्वी पॅऱलिम्पिक खेळांची सांगता
Paris Paralympics : ‘इतक्या’ पदकांसह भारताच्या सर्वाधिक यशस्वी पॅऱलिम्पिक खेळांची सांगता
  • ऋजुता लुकतुके

ऐतिहासिक कामगिरीसह पॅरिस पॅरालिम्पिक (Paris Paralympic) २०२४ मध्ये भारताने आपला प्रवास संपवला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची आपली सर्वोत्तम पदक संख्या नोंदवली आहे. भारताने एकूण २९ पदके जिंकली, ज्यात ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक १९ पदके जिंकण्याचा विक्रम केला होता, जो पॅरिसमधील पॅरा भारतीय खेळाडूंनी मोठ्या मोडला.

पॅरालिम्पिकच्या मागील दोन आवृत्त्यांमध्ये भारताने एकूण ४८ पदके जिंकली आहेत. तर मागील ११ स्पर्धांमध्ये भारताने केवळ १२ पदके जिंकली होती. गेल्या दोन आवृत्त्यांमधून खूप सुधारणा आणि बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

(हेही वाचा – Ind vs Ban, Test Series : बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पंत, बुमराह संघात; श्रेयस, हार्दिकला डच्चू)

पॅरिसपूर्वी, ५४ भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला होता, जो त्यावेळी सर्वात मोठा संघ होता. त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये (Paris Paralympic) ही भारतीय तुकडी मोठी झाली. पॅरिसमध्ये एकूण ८४ पॅरा भारतीय खेळाडूंनी भाग घेतला आणि एकाच स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम करून इतिहास रचला.

टोकियो पॅरालिम्पिकपूर्वी भारताने केवळ ४ सुवर्णपदके जिंकली होती. आता फक्त पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये (Paris Paralympic) भारताने ७ सुवर्ण जिंकले आहेत आणि याआधी टोकियोमध्ये भारताच्या खात्यात ५ सुवर्ण जिंकले होते.

(हेही वाचा – Madhya Pradesh मधील रतलाममध्ये गणेश मिरवणुकीवर दगडफेक; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल)

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधील भारताचे पदक विजेते
  • अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
  • नितेश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)
  • सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64 श्रेणी)
  • हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्णपदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
  • धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F51)
  • प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष उंच उडी (T44)
  • नवदीप सिंग (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F41)
  • मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
  • निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
  • योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
  • तुलसीमती मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU5)
  • सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी (SL4)
  • शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
  • अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक (F46)
  • सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष शॉटपुट (F46)
  • प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो (F51)
  • मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
  • प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
  • रुबीना फ्रांसिस (शूटिंग) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
  • प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
  • मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU5)
  • शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन
  • नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH6)
  • दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर (T20)
  • मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
  • सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, पुरुष भालाफेक (F46)
  • कपिल परमार (जुडो) – कांस्यपदक, पुरुष 60 किलो (जे1)
  • होकाटो होतोजे सेमा (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुषांचा शॉट पुट (F57)
  • सिमरन शर्मा (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 200 मीटर (T12)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.