-
ऋजुता लुकतुके
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये (Paris Paralympics) अवनी लेखराच्या पाठोपाठ मनिष नरवालनेही (Manish Narwal) नेत्रदीपक कामगिरी करताना १० मीटर एअर पिस्तुल एसएच१ प्रकारात रौप्य जिंकलं. भारताचं आतापर्यंतचं हे चौथं पदक ठरलं आहे. आणि विशेष म्हणजे यातील ३ पदकं ही नेमबाजीतील आहेत. आधी अवनी लेखराने १० मीटर एअर रायफल एसएच१ प्रकारात सुवर्ण जिंकलं. तिची सहकारी मोना अगरवालने याच प्रकारात कांस्य नावावर केलं. आणि आता मनिषनेही चांगली कामगिरी करताना रौप्य जिंकलं आहे. दक्षिण कोरियाच्या जिंगडू जोने २३७.४ गुण मिळवत सुवर्ण जिंकलं. तर मनिषला २३४.९ गुण मिळाले.
खरंतर अंतिम फेरीत मनिषने चांगली सुरुवात केली होती. आणि पहिल्या दहा फैरींमध्ये त्याने सातत्याने १० च्या वर गुण मिळवले. पण, शेवटच्या सहा फैरींमध्ये त्याने फक्त एकदाच १०.१ गुण कमावले. बाकी त्याचे गुण ८.८ ते ९.९ मध्ये फिरत राहिले. तिथे सुवर्ण त्याच्या हातातून निसटलं. (Paris Paralympics)
(हेही वाचा – HMIS: महापालिका रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीची अंमलबजावणी)
Manish Narwal Podium Pictures 📸 pic.twitter.com/unSITBsqrJ
— The Khel India (@TheKhelIndia) August 30, 2024
नरवालला २०२० च्या टोकयो ऑलिम्पिकमध्येही ५० मीटर पिस्तुल प्रकारात मिश्र सांघिकमध्ये सुवर्ण मिळालं होतं. हरयाणाच्या फरिदाबादचा असलेला मनिष २३ वर्षांचा आहे. वयाच्या अकराव्या वर्षी एका अपघातात त्याने आपला उजवा हात गमावला. आणि एरवी उजव्या हाताने सगळी कामं करणारा नरवाल डाव्या हातावर अवलंबून राहायला लागला. पण, लवकरच तो अपघातातून सावरला. आणि २०१६ पासून नेमबाजीत तो सक्रिय आहे. पॅरिसमध्ये मिळवलेल्या रौप्य पदकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) त्याचं अभिनंदन केलं आहे. (Paris Paralympics)
(हेही वाचा – विशाळगडावरील अतिक्रमणावर कारवाई कायद्यानुसारच; राज्य सरकारने Bombay High Court मध्ये सादर केले प्रतिज्ञापत्र)
A splendid achievement by Manish Narwal, as he wins the Silver in the P1 Men’s 10m Air Pistol SH1 event. His precision, focus and dedication have once again brought glory. #Cheer4Bharat
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2024
मनिष नरवाल (Manish Narwal) नंतर काहीच मिनिटांत ॲथलेटिक्समध्ये प्रीती पालने यंदाचं पहिलं पदक जिंकून दिलं. तिने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत टी३५ मध्ये कांस्य जिंकलं. या पदकाबरोबरच प्रीतीने १४.२१ सेकंद ही आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही नोंदवली. चीनच्या झियो शियाने १३.५८ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्ण जिंकलं. प्रीती २३ वर्षांची असून मुझफ्फरनगरच्या शेतकरी कुटुंबातील आहे. आणि यावर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही टी३५ प्रकारात तिने कांस्य जिंकलं होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community