आशिया क्रीडा स्पर्धेत (Asian Games) आज भारताची धावपटू पारुल चौधरीने (Parul Chaudhary) इतिहास रचला. पारुलने महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर भारताच्या खात्यात १४वे सुवर्णपदक जमा झाले. असून एकूण पदकांची संख्या ६४ पर्यंत पोहोचली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत भारताचे हे पहिले सुवर्णपदक ( gold medal) आहे, यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.
Parul you beauty 🔥🔥🔥
Parul Chaudhary wins GOLD medal in 5000m #IndiaAtAsianGames #AGwithIAS #AsianGames2022 pic.twitter.com/BADr3nKvsV— India_AllSports (@India_AllSports) October 3, 2023
विशेष म्हणजे पारुलचे हे सलग दुसरे पदक आहे. काल सोमवारी तिने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये मैदान गाजवले होते. तिने ९ मिनिटे २७.६३ सेकंदांची वेळ घेत रौप्य पदक पटकावले होते, तर याच स्पर्धेत भारताच्या प्रिती लांबाने (Priti Lamba) कास्य पदकावर (bronze medal) आपले नाव कोरले होते.