Pat Cummins : ऑस्ट्रेलियन कर्णधार भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचं मनगटाचं हाड ॲशेस मालिके दरम्यान मोडलं.

198
Pat Cummins : ऑस्ट्रेलियन कर्णधार भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकण्याची शक्यता

ऋजुता लुकतुके

अलीकडेच ऑस्ट्रेलियन (Pat Cummins) क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची ॲशेस मालिका खेळला. या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करणारा पॅट कमिन्स (Pat Cummins) भारताविरुद्‌धच्या एकदिवसीय मालिकेला मुकण्याची चिन्ह आहेत. ॲशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. पण, ऑस्ट्रेलियन संघाने ॲशेस चषक आपल्याकडेच राखला. पण, याच मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत खेळताना पहिल्याच दिवशी कमिन्सचं मनगट दुखावलं होतं.

त्याचं (Pat Cummins) मनगटाचं हाड मोडलं असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिका तसंच भारतीय दौऱ्यात कमिन्स खेळण्याची शक्यता खूपच कमी असल्याची बातमी सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राने दिली आहे. भारताबरोबरचा पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबरला मोहालीत होणार आहे.

ॲशेस मालिकेत ओव्हल कसोटीत खेळताना कमिन्सच्या (Pat Cummins) मनगटाला उसळता चेंडू लागला. त्यानंतर कसोटी तर तो खेळला, मात्र मनगटावर जाडजुड बँडेज बांधून. तो संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. आणि ओव्हल कसोटीत त्याने नियमित गोलंदाजी केली. पण, फलंदाजीच्या वेळी त्याला त्रास होताना दिसला. आता त्याच्या दुखऱ्या मनगटावर उपचार सुरू असून त्याला विश्रांतीची गरज आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याविषयी कुठलीही अधिकृत बातमी दिलेली नसली. तरी आगामी दोन दौरे तो विश्रांतीच घेईल अशी चिन्ह आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी कांगारूंचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. इथं संघ पाच एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामने खेळेल. तर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या भारत दौऱ्यात संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. मोहाली, इंदोर आणि राजकोट इथं अनुक्रमे हे सामने होणार आहेत. त्यानंतर दोन्ही संघ एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होतील. आणि ही स्पर्धा पार पडल्यावर ऑस्ट्रेलियाचा उर्वरित भारत दौरा सुरू राहील. पाच टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सुरू राहील.

पॅट कमिन्स (Pat Cummins) एकदिवसीय मालिकेत खेळला नाही तर त्याच्या ऐवजी मिचेल मार्शचा संघातला समावेश नक्की समजला जात आहे. तर संघाचं नेतृत्व पुन्हा एकदा स्टिव्ह स्मिथकडे जाईल असा अंदाज आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथनेच संघाचं नेतृत्व केलं होतं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.