Paul Pogba : पॉल पोग्बावर डोपिंगसाठी ४ वर्षांची बंदी

फ्रेंच दिग्गज फुटबॉलपटूने उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचं समोर आलं आहे. 

220
Paul Pogba : पॉल पोग्बावर डोपिंगसाठी ४ वर्षांची बंदी
  • ऋजुता लुकतुके

फ्रान्सला फिफा विश्वचषक जिंकून देणारा स्टार खेळाडू पॉल पोग्बावर (Paul Pogba) शुक्रवारी उत्तेजक द्रव्य सेवनामुळे ४ वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. इटलीच्या युवेंटस संघाचा मिडफिल्डर म्हणून सध्या तो खेळत होता. आणि तिथेच लीग दरम्यान तो उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळे इटलीच्या उत्तेजक द्रव्य विरोधी न्यायालयाने त्याच्यावर ही कारवाई केली. (Paul Pogba)

गेल्यावर्षी २० ऑगस्टला युडिनिस क्लब विरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या चाचणीत तो दोषी आढळला होता. चाचणीचा निकाल सप्टेंबरमध्ये आला. हा सामना तो खेळला नव्हता. आणि चाचणीत दोषी आढळल्यावर त्याने न्यायालयात खटला लढण्याचा निर्णय घेतला होता. इटलीमध्ये उत्तेजक द्रव्य विरोधी न्यायालय अस्तित्वात आहे. तिथे खेळाडूंच्या अपीलावर चर्चा होते. पोग्बाच्या लघवीचे दोन्ही नमुने हे सदोष आढळले होते. आणि त्यात टेस्टेस्टरेन हे उत्तेजक द्रव्य आढळलं होतं. (Paul Pogba)

(हेही वाचा – Scam : शिखर बँकेच्या घोटाळ्याचा तपास बंद करा; आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा न्यायालयात अर्ज)

उत्तेजक द्रव्य विरोधी पथकाने पोग्बावर ४ वर्षांच्या बंदीची केली मागणी

पोग्बाच्या (Paul Pogba) म्हणण्यानुसार, हे द्रव्य त्याला डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधातून पोटात गेलं होतं. आणि हे औषध नोंदणीकृत अमेरिकन डॉक्टरांनी त्याला दिलं होतं. नकळतपणे आपल्याकडून झालेली ही गोष्ट आहे, असं त्याचं म्हणणं होतं. याउलट उत्तेजक द्रव्य विरोधी पथकाने त्याच्यावर ४ वर्षांच्या बंदीची मागणी केली होती. (Paul Pogba)

न्यायालयाने पोग्बाचं (Paul Pogba) म्हणणं फेटाळून लावत त्याच्यावर ४ वर्षांची बंदी लादली आहे. सप्टेंबर २०२३ पासून तो खेळत नाहीए. आणि हा काळ बंदीच्या कालावधीत धरला जाईल. पण, पोग्बा या निर्णयावर नाराज आहे. न्यायालयाच्या निर्णयावर तो अपील करणार असल्याचं त्याच्या व्यवस्थापकाने सांगितलं आहे. (Paul Pogba)

(हेही वाचा – Aus Vs NZ 1st Test : केन विल्यमसन विल यंगशी टक्कर झाल्यामुळे धावचीत झाला तो क्षण…)

ही चूक पोग्बाला सिद्ध करता आली नाही 

पण, यातून एक शक्यता अशीही आहे की, पोग्बाची (Paul Pogba) कारकीर्दच धोक्यात येऊ शकते. कारण, उत्तेजक द्रव्य घेण्यात पोग्बाची चूक नव्हती. आणि ते औषध त्याने काही महिनेच स्पर्धा खेळत नसताना घेतलं होतं, हे सिद्ध करण्यात तो अपयशी ठरला. या गोष्टी त्याच्या बंदीचा कालावधी कमी करू शकत होत्या. पण, पोग्बाला ते सिद्ध करता आलं नाही, असं न्यायालयाचं म्हणणं पडलं. (Paul Pogba)

पॉल पोग्बा (Paul Pogba) हा फ्रान्सचा २०१८ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य आहे. रशियात झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात क्रोएशियाविरुद्ध पोग्बाने गोल केला होता. आणि तेव्हापासून तो राष्ट्रीय स्टार आहे. अलीकडे ६ वर्षं मँचेस्टर युनायटेडकडून खेळल्यावर २०२२ मध्ये तो युवेंटसमध्ये परतला होता. फ्रान्सच्या राष्ट्रीय संघासाठी तो ८१ सामने खेळला आहे. (Paul Pogba)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.