पाकिस्तान क्रिकेटमधून अलिकडे धक्कादायक घटना समोर येत आहेत. भ्रष्टाचाराविरोधी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या क्रिकेटरवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
( हेही वाचा : औरंगाबादमधील गोंधळानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ, शिवसंवाद यात्रेला अतिरिक्त पोलीस राहणार तैनात )
पाकिस्तानी क्रिकेटवर दोन वर्षांची बंदी
आसिफ आफ्रिदी या ३६ वर्षीय खेळाडूवर बंदी घालण्यात आली आहे. २२ सप्टेंबर २०२२ पासून त्याच्यावर ही बंदी घातल्याचे मानले जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंदर्बात निवेदन जारी करत माहिती दिली आहे. आसिफ आफ्रिदी हा गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय टी२० स्पर्धेदरम्यान भ्रष्टाचारामध्ये सहभागी असल्याने आफ्रिदीला निलंबित करण्यात आले होते आफ्रिदीने या प्रकरणाला दयापूर्वक रितीने हाताळण्याची विनंती केली होती.
पाकिस्तानी खेळाडूवर ही बंदी येण्याची पहिलीच वेळ नसून याआधी सुद्धा फिक्सिंग प्रकरणी अनेक बड्या खेळाडूंना या बंदीचा सामना करावा लागला आहे. यामध्ये माजी कर्णधार सलमान बट, वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ, मोहम्मद अमीर आणि सलीम मलिक यांचा समावेश आहे. वसीम अक्रम आणि वकार युनूस हे खेळाडू सुद्धा मॅच फिक्सिंगमध्ये सामील होते.
Join Our WhatsApp Community